Sunday 31 December 2023

युवकांनी मैदानी खेळ खेळावे : दिपक ( बाबा ) हांडे

युवकांनी मैदानी खेळ खेळावे : दिपक ( बाबा ) हांडे

*संघर्ष क्रीडा मंडळ भटवाडी येथील मैदानात लाल माती टाकण्याचे काम सुरू*

घाटकोपर, (शांताराम गुडेकर) :

युवकांनी सतत मोबाईलचां वापर कमी करून मैदानी खेळ खेळावे असा सल्ला शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक दिपक ( बाबा ) हांडे यांनी युवकांना दिला. आज भटवाडी येथील संघर्ष क्रीडा मंडळ येथील मैदानात लाल माती टाकण्याचे काम सुरू करण्यात आले त्याचा शुभारंभ हांडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेविका अश्विनी दिपक हांडे, माजी शाखा प्रमुख संतोष साळुंखे, सुरेखा म्हात्रे, प्रकाश साबळे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिपक ( बाबा ) हांडे यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात आपल्या हजारो कार्यकर्त्यासह पक्ष प्रवेश केला. दिपक ( बाबा ) हांडे हे साईभक्त असून त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात जनाधार आहे. 2014 मध्ये त्यांनी भटवाडी विभागातून अपक्ष निवडणूक लढवून ते निवडून आले होते त्यानंतर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सहभागी झाले होते. मात्र पक्षात आल्यापासून कोणत्याच पदाची जबाबदारी न दिल्याने तसेच विभागात विकास कामे व्हावी या उद्देशाने त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्यातील विविध विकासकामे पाहून हांडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. हांडे यांच्या पक्ष प्रवेशामुळे घाटकोपर पश्चिम विभागात ताकद वाढली असल्याचे बोलले जात आहे 

*युवकांनी मैदानी खेळ खेळावे यासाठी मैदाने खेळासाठी मोकळे करणार*

युवक, युवती हे सध्याच्या युगात सारखे मोबाईल असल्याचे पाहिले जाते मुलांनी मैदानी खेळ क्रिकेट, कबड्डी, खो खो व इतर खेळ खेळल्यास त्यांचे आरोग्य देखील उत्तम राहील. आपल्या देशात खेळाला फार महत्त्व आहे. खेळ हा सुद्धा करियरचां भाग आहे. भटवाडी मध्ये लवकरच क्रीडा संकुलाचे काम होणार आहे. चांगले खेळाडू घडावे यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे माजी नगरसेवक दिपक ( बाबा ) हांडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...