Sunday 31 December 2023

अंगणवाडी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना न भेटता ग्रामीण विकास मंत्री यांचे पलायन - आयटकच्या आरोप

अंगणवाडी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना न भेटता ग्रामीण विकास मंत्री यांचे पलायन - आयटकच्या आरोप

जळगाव, प्रतिनिधी .. महाराष्ट्र राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीस या किमान वेतन २६ हजार रुपये व १८ हजार रुपये मिळावा तसेच पेन्शन योजना लागू करावी म्हणून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ग्रॅच्युइटी मिळावी. म्हणून मुलांना दर्जेदार खाऊ मिळावा. खाऊ शिजवण्याचे दर वाढून मिळावे या मागण्यांसाठी ४ डिसेंबर २४ पासून संपावर आहेत. या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघालेला नाही. 

दुसरीकडे महाराष्ट्राचे जबाबदार मंत्री यांनी नागपूर विधानसभेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्नावर चर्चा करताना नकारात्मक व राजकीय भाषा वापरली तसेच महिला बालकल्याण आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दहशत दडपशाही निर्माण करण्यासाठी २२ डिसेंबर रोजी परिपत्रक काढले. या परिपत्रकाविरुद्ध देखील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा रोष आहे. त्या परिपत्रकात म्हटले आहे की, अंगणवाडीतील मुलांच्या खाऊ आशा बचत गट, महिला, ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरसेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, मराठी शाळेचे शिक्षक यांना कामाला लावून वाटू  असे म्हटले आहे. दुसरीकडे बचत गटांची दहा महिन्याची बिल दिलेली नाहीत म्हणजेच परिपत्रक संपावरील कर्मचाऱ्यांना धमकावण्यासाठी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका मदतनिसांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे. 

अंगणवाडी कर्मचारी संपात माननीय मंत्री महोदय यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी या अपेक्षेने निवेदन सादर करण्यासाठी जळगाव जिल्हा अंगणवाडी कर्मचारी कृती समिती तर्फे अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनचे सचिव अमृत महाजन, अंगणवाडी कर्मचारी संघाच्या सुषमा चव्हाण, जिल्हा संघटक ,भानुदास पाटील हे चोपडा धरणगाव जामनेर जळगाव तालुक्यातील ५०/६० अंगणवाडी सेविकां सोबत गिरीश महाजन यांच्या कार्यालयात जमले होते तसेच पाचोरा, जामनेर, यावल तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे प्रतिनिधी त्यांच्या मागण्यांचे निवेदन घेऊन आले होते. माननीय ग्रामीण विकास मंत्री कर्मचाऱ्यांच्या प्रश्नात सकारात्मक भूमिका घ्यावी आणि महिला बाल विकास आयुक्त यांच्या  परिपत्रकाच्या निषेध भावना कळविण्यासाठी ग्रामीण विकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे कार्यालयातील जबाबदार संपर्क अधिकारी श्री तायडे यांनी दिलेल्या दुपारी बारा वाजेच्या वेळेनुसार नामदार मंत्री महोदय यांच्या घरी येणार आहोत, असे एक दिवस अगोदर ठरले होते, त्यानुसार जिल्ह्यातील दोन्ही संघटनांचे प्रतिनिधी आणि ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सहा प्रतिनिधी नामदार गिरीश महाजन यांना जामनेर येथे भेटावयास आज सकाळी अकरा वाजेपासून जमत होते. नियोजित वेळ बारा वाजेची वेळ दिली होती. पण साडेदहा वाजताच नामदार गिरीश महाजन कार्यालयातून निघून गेले.  सेविका मदतनीस दोन वाजेपर्यंत त्याच्या घरी बसून होते. पोलिसांनी ते नेरी येथे आहेत असे सांगितले. मग काही सेविका मदतनीस नेरीला ही गेल्या. एका लग्न समारंभात त्यांची शोधाशोध केली पण तेथूनही ते एक तासापूर्वीच निघून गेले.असे कळले 

दुसरी बाब अशी की,  त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी ते दुपारी तीन वाजेपर्यंत येतील असे सांगत तर ना. गिरीश भाऊ यांना १.३० वाजेच्या सुमारास फोन केला असता ते म्हणाले की, मी सायंकाली सहा वाजेपर्यंत येईल. आता ऐनपुर ला निघालो आहे. मला ५० लग्नांचे आमंत्रणे आहेत असे त्यांनी उत्तर दिले. तरीही कार्यालयातील कोणीतरी निवेदन घ्यायला येईल या अपेक्षेने सेविका मदतनीस दोन वाजेपर्यंत त्याच्या घरी बसून होते. कार्यालयात चहापाणी सौजन्यही दाखवले गेले, शेवटी पोलिसांनी ते नेरी येथे आहेत असे पोलीस स्टेशन कडून कळाले असे सांगितले वर मग आम्ही नेरीला असता पोलिसांनी सांगितले की, जा आम्ही पी. आय. साहेबांना फोन केला आहे. असे सांगितले. प्रत्यक्षात काही सेविका मदतनीस नेरीला ही गेल्या‌, तेथे महाजन जेथे एका लग्न समारंभात उपस्थित होते तेथे त्यांची शोधाशोध केली पण तेथून ते एक तासापूर्वीच निघून गेले असे कळले. जिल्ह्याचे जबाबदार व मान्यवर मंत्री भाजप सरकारचे संकट मोचक मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे संकट मोचक भूमिका घेऊन दिलदार मनाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असते निवेदन घेणे व चर्चा करणे यासाठी पाच दहा मिनिटं पुरेशी होती त्यांनी भेट दिली असती तर त्यांचे विषयीचा रोष शांत झाला असता पण.. त्यांना सामान्य कर्मचाऱ्यांविषयी काही संवेदनाच नाहीत असेच दिसून आले. नामदार गिरीश महाजन यांच्या अंगणवाडी संप बाबत नकारात्मक भूमिकेचा आम्ही निषेध करतो. असे जळगाव जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटना कृती समितीचे पत्रकात म्हटलेले आहे

तसेच ग्रामीण विकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांचे नावे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे कर्मचाऱ्यांना पगारासाठी शंभर टक्के अनुदान.ध्या. पगारासाठी वसुली ची आट नको.. दहा टक्के आरक्षण नुसार भरती करा जिल्हा परिषदेमधील वर्ग ड ची पदे भरा. आधी मागण्यांचे निवेदन सुद्धा कॉम्रेड अमृत महाजन, जिल्हा सचिव राजेंद्र खरे, उपाध्यक्ष किशोर कनडारे, क्षीरसागर, निलेश पाटील. यांनी सादर केले असून त्यांच्या मंत्रालयाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्ग न काढल्यास इतिहास 16 जानेवारीपासून त्यांच्या जिल्हा परिषद समोरील भाजप संपर्क संपर्क कार्यालय समोर राज्यव्यापी जिल्हावार धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदन सादर करून देण्यात आला अशी ही माहिती काँ अमृत महाजन यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे.

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...