Wednesday, 29 April 2020

उल्हासनगर महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांची मोफत कोरोना टेस्ट करा

उल्हासनगर महापालिकेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांची मोफत कोरोना टेस्ट करा
सिद्धांत गाडे उल्हासनगर  -  
उल्हासनगर महापालिकेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांची मोफत कोरोना टेस्ट करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटक सचिव प्रविण खरात यांनी पालिका आयुक्त यांना पत्राद्वारे केली आहे. 
सध्या संपूर्ण देशात कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे, या महामारी संकटाविरुद्ध उल्हासनगर महापालिका परिक्षेत्रात अधिकारी कर्मचारी लढा देत आहेत. परंतू हा लढा देत असताना सहजिकच त्यांच्यामध्येही भितीचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढावे याकरिता सर्वांची मोफत कोविड तपासणी करण्यात यावी, अशी मागणी प्रविण खरात यांनी उल्हासनगर महानगर पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.
त्याचप्रमाणे अंबरनाथ नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची यांचीसुद्धा मोफत कोरोना टेस्ट करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटक सचिव प्रविण खरात यांनी अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पवार यांना पत्राद्वारे केली आहे.
अंबरनाथ येथील कोरोना महामारी संकटाविरुद्ध अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रात अधिकारी कर्मचारी लढा देत आहेत. परंतू हा लढा देत असताना साहजिकच त्यांच्यामध्येही भितीचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढावे याकरिता सर्वांची मोफत कोविड तपासणी करण्यात यावी, अशी मागणी प्रविण खरात यांनी अंबरनाथ नगरपरिषद मुख्याधिकारी पवार साहेब यांच्याकडे केली आहे.
तसेच प्रविण खरात यांनी यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही ईमेल द्वारे मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण मध्ये रंगला नगरकर प्रिमियर क्रिकेट लिग स्पर्धचा थरार !

कल्याण मध्ये रंगला नगरकर  प्रिमियर  क्रिकेट लिग स्पर्धचा  थरार ! कल्याण, प्रतिनिधी - कल्याण मध्ये आम्ही नगरकर प्रतिष्ठान आयोजित ...