Wednesday 29 April 2020

नियमांचे काटेकोर पालन केले तरच कोरोनाच्या प्रसारापासून बचाव होऊ शकेल उल्हासनगर - पालिका आयुक्त सुधाकर देशमुख

नियमांचे काटेकोर पालन केले तरच कोरोनाच्या प्रसारापासून बचाव होऊ शकेल उल्हासनगर - पालिका आयुक्त सुधाकर देशमुख
सिद्धांत गाडे उल्हासनगर - 
दिनांक 27 एप्रिल 2020 पर्यंत उल्हासनगर शहरांमध्ये एकूण दोन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. यापैकी एक रुग्ण पूर्णपणे बरा होऊन मार्च महिन्यामध्ये घरी आलेला आहे. दिनांक 27 एप्रिल 2020 रोजी आढळलेला दुसरा रुग्ण उल्हासनगर 4 येथील कोव्हिड रुग्णालयात दाखल आहे. दिनांक 28 एप्रिल 2020 रोजी यापूर्वी आढळलेल्या रुग्णाचे जवळच्या संपर्कातील कुटुंबातील चार सदस्यांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांनाही लगेचच कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय कल्याण येथील 1 व बदलापूर येथील 3 कोरोनाग्रस्त रुग्ण यांच्यावर उपचार सुरू असून सर्व 9 रुग्णांची तब्येत स्थिर आहे. अशी माहिती पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे.
आज पुन्हा बदलापूर येथील 3 कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल करण्यात आलेले असल्यामुळे रुग्णालयातील रुग्णांची संख्या 12 झालेली आहे. याशिवाय उल्हासनगर शहरातील कोरोनासाठी निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या मात्र SAR Beco चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या महिलेवरही उपचार सुरू असून तिचीही तब्येत सुधारत आहे. कोरोनासाठी तिची पुन्हा चाचणी घेण्यात येत असून रिझल्ट निगेटिव्ह आल्यास त्या महिलेस घरी सोडण्यात येईल. असे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले.
दिनांक 27 एप्रिल 2020 रोजी निधन झालेल्या 87 वर्षीय महिलेची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे एका खाजगी प्रयोगशाळेकडून आज दिनांक 29 एप्रिल 2020 रोजी कळविण्यात आले आहे. ही महिला कॅम्प नंबर तीनमध्ये फॉलवर लाईन या भागात राहत असल्यामुळे शहरातील चिंता वाढलेली आहे. शहरातील नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणात सतर्क राहणे आवश्यक झाले असून नियमांचे काटेकोर पालन केले तरच कोरोनाच्या प्रसारापासून बचाव होऊ शकेल. असेही पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्पष्ट केले आहे

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...