Monday 27 April 2020

गरीब मजुर भाडेकरू व गरजु कुटुंबीयांना "भोजनदान" करुन साजरा केला वाढदिवस

गरीब मजुर भाडेकरू व गरजु कुटुंबीयांना "भोजनदान" करुन साजरा केला वाढदिवस
पनवेल -अण्णा पंडित
अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष विनोद चाळके यांनी अविरत समाजसेवेचा वसा घेतलेला असुन अन्याय अत्याचार निर्मुलन समिती चे संस्थापक अध्यक्ष रवींद्र (दादा) जाधव यांच्या प्रेरणेने व राज्य सचिव महेंद्र तथा अण्णा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष चाळके हे समाजातील दलित पिडीत वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असतात.
अनेक राष्ट्र आज कोरोना विषाणूं या महामारीचा मुकाबला करीत आहे. संपुर्ण देशात या आपात्कालीन परीस्थितीत दि. ०३ मे पर्यंत लॉक-डाऊन अर्थात संचारबंदी असुन त्याचा हातावर पोट असणाऱ्या जनतेच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. याचे भान ठेवून व समाजसेवेचे बाळकडू घरातुनच मिळालेले असल्याने संतोष चाळके यांची अर्धांगिनी आयुष्यमती अविता संतोष चाळके यांचा वाढदिवस त्यांनी पनवेलमधील टेंभोडे गावातील गरीब मजुर भाडेकरू व गरजू कुटुंबाला भोजनदान देवुन अनोख्या पद्धतीने साजरा केला. अर्थात या सर्व धामधुमीत कार्यकर्त्यांकडून फिजीकल डिस्टन्सिंग चे योग्य रीतीने पालन  केले गेले. गावातील शेकडो कुटुंबीयांनी भोजनदानाचा लाभ घेतला. अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष रविंद्रदादा जाधव, राज्य सचिव महेंद्र तथा अण्णा पंडित. ठाणे जिल्हाध्यक्ष अमीत साळवे यांच्या सह संघटनेचे इतर पदाधिकारी प्रेमलता जाधव(राज्य उपाध्यक्षा) राधाताई क्षीरसागर (नासिक जिल्हाध्यक्षा) रफिक सय्यद, ममता पुणेकर,रेखा मंजुळकर,सुनीता सोनार, सुनील ऊकीर्डे(नासिक) वसंतराव वाघ. (ओझर)संदिप भालेराव (सिन्नर) विनोद भोसले, संजय गायकवाड (निफाड) परविन बागवान,मीना शिरसाठ (चांदवड) इत्यादींनी श्रीमती अविता संतोष चाळके यांना विविध माध्यमांतून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असुन भोजनदान करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...