Tuesday 28 April 2020

राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुनिलजी तटकरे युवा प्रतिष्ठान च्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुनिलजी तटकरे युवा प्रतिष्ठान च्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश ठप्प झाला आहे. कोरोना विषाणूची संक्रमण साखळी तोडून कोरोना विषाणूचे देशातून समूळ उच्चाटन करण्यासाठी देशात सर्वप्रथम लाॅकडाऊन संचारबंदी लावण्यात आली आहे. या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे नागरिकांच्या संचार स्वातंत्र्यावर आणि नोकरी धंदा व मोलमजुरीवर कायद्याने निर्बंध आले आहेत. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊन त्यांच्यावर आर्थिक उपासमारीची वेळ आली आहे. 
      लाॅकडाऊन संचारबंदी च्या कालावधीत गोरगरीब, गरजू, आर्थिक दृष्ट्या दुर्बल समाज घटकातील नागरिकांचे खाण्यापिण्याचे हाल होऊ नये व कोणीही उपाशी पोटी राहू नये म्हणून केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त सहयोगाने नागरिकांना रेशनिंग कार्डच्या माध्यमातून मोफत व अल्प दरात तांदूळ, गहू, डाळी साखर इत्यादींचा त्या त्या ठिकाणी  पुरवठा सर्वत्र करण्यात येत आहे. 
      याच पार्श्वभूमीवर दुसरीकडे अनेक संस्था, सामाजिक संघटना, समाजातील दानशूर व्यक्ती आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून गोरगरीब सर्व सामान्य जनतेला आपापल्या परीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. 
    कोरोना मुक्तीच्या या राष्ट्रीय लढ्यासाठी लोकप्रिय खासदार माननीय सुनिलजी तटकरे साहेब, आमदार अनिकेत तटकरे आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय अदितीताई तटकरे यांच्या प्रत्येकी खासदार, आमदार आणि पालकमंत्री सरकारी निधीतून कोरोना मुक्तीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरीव निधी देण्यात आला. तसेच सध्याच्या लाॅकडाऊन संचारबंदी कालावधीत संपूर्ण रायगड जिल्ह्यातील विविध प्रभागातील  नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खासदार सुनिलजी तटकरे संचालित युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या पार्श्वभूमीवर खासदार सुनिलजी तटकरे साहेब युवा प्रतिष्ठानच्या वतीने पेण तर्फे तळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री. नितीन चांदोरकर, माजी सरपंच श्री. मनोहर वाघरे आणि माजी तंटामुक्त अध्यक्ष श्री. नामदेव कासारे यांच्या हस्ते    सोमवार दिनांक २७ एप्रिल आणि मंगळावर दिनांक २८ एप्रिल २०२० रोजी माणगांव तालुक्यातील पेण तर्फे तळे, बोरघर आणि आमडोशी या गावातील सर्व सामान्य कुटुंबातील गोरगरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक किराणा वस्तू व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...