Tuesday 28 April 2020

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालया चा अनागोंदी कारभार लोकांच्या जीवावर उठलाय.

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालया चा अनागोंदी कारभार लोकांच्या जीवावर उठलाय... 
         
सिध्दांत गाडे, उल्हासनगर  -  युथ ऑफ टुडे वेलफेअर फाऊंडेशन मार्फत कवट्याची वाडी बदलापूर येथील डोंगरात आदिवासी पाडय़ातील नागरिकांना जेवन वाटप करण्यासाठी संस्थेचे स्वयंसेवक गेले असताना त्यांना समजले की वाडीतील एका आदिवासी मुलाच्या हाताला झाडावरून पडून मार बसल्याने हाताला फॅक्चर झाला आहे. बदलापूर येथील शिवाजी महाराज चौकामधील महाडिक डॉक्टर यांच्याकडे त्याच्यावर उपचार करण्यासाठी होऊन गेले होते. तेथील डॉक्टरांनी उपचाराचा खर्च वीस हजार रुपये एवढा सांगितला. अश्या परिस्थितीमध्ये आदिवासी मुलांच्या आईने आम्हाला संस्थेकडे मदतीचा हात मागितला. मुलाला वडील नसल्याने आई त्याचे संगोपन करीत होती. मग संस्थेमार्फत मुलाच्या उपचारासाठी संस्थेचे अध्यक्ष मार्शल नाडर यांनी त्या मुलाला सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर नंबर तीन येथे नेहुन दोन दिवस त्याच्यावर उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आला. हाताला दोन्ही 2 ठिकाणी फॅक्चर असल्यामुळे त्याचे ऑपरेशन करण्याचा तेथील डॉक्टरांनी सल्ला दिला व लवकरच ठाणे येथील कळवा हॉस्पिटलला घेऊन जा असे सांगण्यात आले. आज संध्याकाळी संस्थेमार्फत त्याला कळवा हॉस्पिटल ठाणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले पण ते पुढे मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवत आहे. कोरोनाच्या वाढत्या  परिस्थिती मुंबईच्या हॉस्पिटलला जाणं तेवढेच धोकादायक आहे.
आपल्याकडे खासगी दवाखान्या शिवाय दुसरा पर्याय नाही. फॅक्चर होऊन चार दिवस झाल्यास लवकरात लवकर आताचे ऑपरेशन नाही केले तर त्याला आयुष्यभरासाठी हाताला मोठी इजा होण्याची शक्यता आहे. 
काल रात्री सामाजिक संघटना द्वारे सोशल मीडिया वरील केलेल्या तीव्र आंदोलन पाहता सेंट्रल हॉस्पिटल प्रशासनाद्वारे मुलाला एडमिट केले गेले आहे. आज ऑपरेशन करण्यात येणार असतानाच प्रशासना बाहेरुन काही आरोग्य सामग्री आणण्यास सांगितली, त्याची तैयारी करत असतानाच डॉक्टर म्हणाले कि आमच्याकड़े एनेस्थेसिया डॉक्टरची व्यवस्था नाही आहे, देउ नाही शकत. 
आधीच सेंट्रल हॉस्पिटल प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे उल्हासनगर येथील वरिष्ठ पत्रकार रामेश्वर गवई यांची मुलगी आमच्यातुन निघुन गेली, तर दुसऱ्या घटनेत गरोदरबाईला सेंट्रल हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी 2 वेळा घरी पाठवले गेले, आणि आता हे प्रकरण यामुळे सेंट्रल हॉस्पिटल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
उल्हासनगर येथील सामाजिक संघटना द्वारे मुख्यमंत्री, आरोग्यमन्त्री, ठाणे जिल्हाधिकारी, आयुक्त यांना ट्विट करुन व विभिन्न सामाजिक कार्यकर्तेद्वारे प्रशासनावर कार्रवाई करणेसाठी सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...