Monday 31 July 2023

ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळ समृध्दी महामार्गावर पुलाचे गर्डर बसवताना अपघात, १६ जणांचा मृत्यू !

ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळ समृध्दी महामार्गावर पुलाचे गर्डर बसवताना अपघात, १६ जणांचा मृत्यू !

भिवंडी, दिं,१, अरुण पाटील (कोपर) :
 
नागपूर-- मुंबई समृध्दी महामार्गवर अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून असाच एक विचित्र अपघात ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळ सरलांबे  समृद्धी एक्सप्रेस हायवेवर सोमवारी रात्री उशिरा  घडला आहे.या ठीकणी पुलाचे गर्डर बसवण्याचे काम सुरू असताना गर्डर लॉन्चिंग मशिन १०० फूट उंचीवरून खाली पडले. यात १६ मजुरांचा मृत्यू झाला आहे. तिघे जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आताही अनेक मजूर दबलेले असण्याची भीती व्यक्त होत आहे. 

सद्या  बचावकार्य सुरू असून वास्तविक, गर्डर मशीनचे वजन जास्त असल्याने ते लवकर हटवण्यात अडचणीत येत आहेत. शाहपूर उपजिल्हा रुग्णालयात सुमारे १६ मृतदेह आणण्यात आले आहेत. 

एक्स्प्रेस वेवर रात्रीच्या वेळी गर्डर बसवण्याचे काम सुरू होते. त्यानंतर एक गर्डर मशीन खाली पडले. अवजड मशिन पडल्यामुळे बचाव पथकाला ढिगारा हटवण्यात अडचण येत आहे. एनडीआरएफचे पथक अपघातस्थळी बचाव कार्य करत आहे. गर्डरचा मोठा ढिगारा हटवण्यासाठी क्रेन घटनास्थळी पोहोचली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती... 

वृत्तानुसार, शाहपूर उपजिल्हा रुग्णालयात सुमारे १६ मृतदेह आणण्यात आले आहेत. तीन ते चार जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अंधारामुळे अजून किती लोक मशीनच्या गर्डरखाली गाडले गेले हे सांगता आले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गाचे दोन टप्पे सुरू झाले आहेत. सध्या नागपूर ते इगतपुरी असा समृद्धी महामार्ग सुरू आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा आणि तिसरा टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा १०० किलोमीटरचा टप्पा आहे. 

समृद्धी महामार्गाला हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. मुंबई आणि नागपूरला जोडणारा हा ७०१ किलोमीटर लांबीचा द्रुतगती मार्ग आहे. जो नागपूर, वाशिम, वर्धा, अहमदनगर, बुलडाणा, औरंगाबाद, अमरावती, जालना, नाशिक आणि ठाणे या १० जिल्ह्यांतून जातो. 

समृद्धी महामार्गाचे बांधकाम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे. डिसेंबर २०२२  मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी आणि नागपूर दरम्यानच्या ५२० किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. त्यानंतर या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. नागपूर ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर गाव असा एकूण ६०० किमीचा रस्ता खुला करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...