Sunday 30 July 2023

जिजाऊ संस्थेच्या वतीने आमचा महासागर, आमची जबाबदारी हा किनारपट्टी स्वच्छता अभियान उपक्रम !!

जिजाऊ संस्थेच्या वतीने आमचा महासागर, आमची जबाबदारी हा किनारपट्टी स्वच्छता अभियान उपक्रम !!

जव्हार, जितेंद्र मोरझा :

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने वसई तालुक्यातील भुईगाव समुद्रकिनारी स्वच्छता अभियान मोहीम राबवण्यात आली. 

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक मा. श्री.निलेश भगवान सांबरे हे गेली १४ वर्षे आपल्या स्वकमाईतून समाजसेवा या तत्वाच्या आधारे संपूर्ण कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यात कार्यरत आहेत. आरोग्य सेवा, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगार आणि क्रिडा अशा अनेक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांच्या माध्यमातून त्यांनी लाखो गरजूंना मदतीचा हात पुढे केला आहे. इतकेच नाही तर समाजाच्या दृष्टीने ते संपूर्ण कोकणात अनेक समाजपयोगी उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवत असतात. 

गेल्या काही दिवसांपासुन वसई समूद्र किनारी मोठ्या प्रमाणावर साठलेल्या कचऱ्यामुळे या किनारपट्टीची अवस्था दयनीय झाल्याचे पाहायला मिळत आहे.प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, थर्माकोल हे समुद्रात, नाल्यात फेकले जातात आणि हाच कचरा समुद्र भरतीच्या वेळी बाहेर फेकला जातो. इतकेच नाही तर मागील ४,५ दिवसांपासून उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं होतं. यामुळे शहरातील सर्व कचरा बीचजवळ येऊन साचला होता. या कचऱ्यामुळे साथीचे रोग पसरून तेथील नागरिकांना आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्यता होती. तसेच भुईगाव समुद्रकिनारी फिरण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. दरम्यान या बिचवर कचऱ्याचे साम्राज्य असल्याने बीचवर भेट देणाऱ्या पर्यटकांना दुर्गंधी व अस्वच्छतेला सामोरे जावे लागत़े. यामुळे पर्यटक देखील बीचवर येण्यास टाळाटाळ करतात. ज्यामुळे इतर स्थानिक व्यवसायिकांचे देखील नुकसान होते. सदर बाब जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ भुईगाव बीचवर स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. या स्वच्छता मोहीम अंतर्गत त्यांनी बीचवर पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, खाऊचे कागद आदींची साफसफाई करण्यात आली.

यावेळी स्थानिक नागरिक, निसर्गप्रेमी तरुण तसेच महानगरपालिका प्रभाग समिती ई चे कर्मचारी जिजाऊ संस्था वसई तालुका अध्यक्ष हर्षाली चंद्रकांत खानविलकर,अमित नाईक, अभिषेक गोरुले, अभिजित गायकवाड, शिवसेना महिला शहर संघटक रुचिता नाईक, सामाजिक कार्यकर्ते मंगेश मस्के देखील उपस्थित होते.याप्रसंगी जिजाऊ संस्थेचा प्रयत्नातून समुद्रकिनारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले गेले व स्थानिक नागरिकांना देखील स्वछतेची खबरदारी घेण्यास सांगितले.

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...