Friday 28 July 2023

बारवी डँम अद्यापही भरलेला नाही, विविध अफवांचे पिक, अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाचे अवाहन !

बारवी डँम अद्यापही भरलेला नाही, विविध अफवांचे पिक, अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाचे अवाहन !

कल्याण, (संजय कांबळे) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीचा असलेला बारवी डँम अद्याप भरलेला नाही, या धरणाला स्वयंचलित वक्रव्दारे असल्याने धरणाची पाणी पातळी ७२:६० मीटर पर्यंत गेल्यानंतरच धरणातून पाण्याचा विसर्ग होतो आणि पाणी पातळी कमी झाल्यावर हे वक्रव्दारे आपोआप बंद होतात व पाणी विसर्ग थांबतो, ही सत्यता असताना एमआयडीसी ने एक पत्र काढून उल्हास नदी काठच्या गावाना सतर्कतेचा इशारा दिला आणि सोशलमिडियावर धरण भरल्याच्या अपवांचे पिक आले. परंतु अद्यापही धरण भरलेले नाही, पाण्याची पातळी वाढत असली तरी धरण भरण्यासाठी एक आठवडा किंवा पाऊस जास्त झाला तर २/३ दिवसात ही भरेल असे बारवी धरणाचे उप अभियंता श्री मेश्राम यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे अवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

२६ जुलै २००५ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ढगफुटी पावसामुळे हाहाःकार उडाला होता. याचा फटका कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा, मानिवली, रायते, मोहीली आदी गावाना बसला होता, तीन दिवस या परिसरात पाणी होते, डोळ्यासमोर या परिसरातील लोकांचे जीव व संसार उध्वस्त झाले होते. उल्हास नदीने आक्राळविक्राळ रुप धारण केले होते. तीन दिवसानंतर डोंगरावर आसरा घेतलेले नागरिक उरल्या सुरल्या घराकडे येवून गाळ काढण्याचे काम करत असतानाच कोणीतरी बारवी धरण फुटले अशी अफवा आणली आणि पुन्हा सगळे लोक जीव वाचवण्यासाठी डोंगराकडे धाऊ लागले. तेव्हा पासून ते आजपर्यंत या गावातील लोक २६ जुलै हा दिवस उगवला की घाबरगुंडी उडते.

सध्या कल्याण तालुक्यात ४ नद्या भरून वाहत आहेत, उल्हास नदीवरील रायते पुलावर पाणी आल्याने मागील आठवड्यात कल्याण नगर हा मार्ग बंद झाला होता. अजूनही पाऊस पडत आहे. अशातच एमआयडीसी ने उल्हास नदी काठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देणारे पत्र प्रसिद्ध केले. यामध्ये त्यांनी म्हटलं की, २६ जुलै सांयकाळी ४ वा धरणाची पातळी ७०:५० मी ऐवढी वाढली आहे, संभाव्य येव्यामुळे पाणी पातळीत सतत वाढ होत आहे, धरणास ११ स्वयंचलित वक्रव्दारे बसविण्यात आले आहेत. त्याची उच्चतम विसर्ग पातळी ७०:६० मी आहे, धरणाची पाणी पातळी ७०:६० मी तलांकावर गेल्यानंतर स्वयंचलित वक्रव्दारे आपोआपच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होईल व पाणी पातळी ७०:६० मी खाली गेल्यावर आपोआप बंद होऊन विसर्ग थांबेल. सद्यस्थितीत  चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे उल्हास नदीस पुर परिस्थिती उदभवलेली आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करणे शक्य नाही त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे धरणाची पाणी पातळी कधीही ७०:६० मी जावू शकते व स्वयंचलित वक्राव्दारे उल्हास नदीत पाण्याचा विसर्ग होऊ शकतो, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. आणि याचा प्रत्येकाने आपापल्या सोईप्रमाने अर्थ काढून सोशलमिडियावर मागील, जुने पुराणे विडियो टाकून अफवांचा बाजार मांडला. यामुळे नदीच्या काठावर वसलेल्या म्हारळ, वरप, कांबा, रायते, आपटी, चांदप, पिंपळोली, रहाटोली, पाद-याचा पाडा, आदी शेकडो गावातील नागरिकांची काळजी वाढली,

याबाबत बारवी डँमचे उप अभियंता श्री मेश्राम यांना विचारले असता ते म्हणाले, अद्याप डँम भरलेला नाही, तो भरण्यासाठी एक आठवडा किंवा पाऊस धरणक्षैत्रात चांगला झाला तर २/३ दिवसाही भरेल, या धरणास स्वयंचलित वक्रव्दारे असल्याने ते आपोआप उघडतील, व पाणी पातळी खाली गेल्यावर आपोआप बंद होतील, त्यामुळे या पाण्याने उल्हास नदीस फारसा फरक पडत नाही, या नदीवर पुढे व आंध्र धरण असल्याने त्याचे ते पाणी आहे. म्हणून नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...