Friday 28 July 2023

नाशिक अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई !!

नाशिक अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई !!

*तब्बल दीड कोटीचा प्रतिबंधित गुटखा व तीस लाखाचे वाहन जप्त*

मात्र भिवंडी व परीसरात खुलेआम होते विक्री, कारवाई कधी नागरिकांचा सवाल ?

भिवंडी, दिं,२८, अरुण पाटील (कोपर) :
           नाशिक शहरातील पंचवटीतील एका दुकानावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने छापा टाकून तब्बल दीड कोटींचा गुटखा जप्त  केला आहे. नाशिक  अन्न आणि औषध प्रशासनाने दुकानात, चारचाकी वाहनात आणि घरात साठविलेला सुमारे दीड कोटी रुपयांचा गुटखा आणि  तीस लाख रु. किंमती वाहनं जप्त करून दुकान सील केले आहे. याप्रकरणी दुकान मालकाच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
           मात्र भिवंडीत गुजरात मार्गे येणाऱ्या व  भिवंडी शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर खुले आम विक्री होणाऱ्या प्रतीबंधित गुटख्यावर कारवाई कधी होणार या बाबत नागरिकांना मधून सवाल उपस्थित होत आहे. भिवंडी शहर व परिसरातील ग्रामीण भागातील पान टपऱ्या, दुकाने, जनरल स्टोर्स या ठिकाणी खुलेआम गुटखा विकला जात आहे.
            भिवंडीतील नारपोलि पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडाऊन पट्ट्यात गुजरात मार्गे येणारा गुटखा उतरवला जात आहे.त्या ठिकाणावरून विविध ठिकाणी वितरित केला जातो.अश्याच प्रकारे narpoli पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर्णा गाव गेट नं -२, जेके पेट्रोल पंपा जवळील श्री.गणेश जनरल स्टाअर्स आणि याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काल्हेर गाव बस स्टॉप जवळ अंबिका जनरल स्टोअर्स या ठिकाणा वरून सर्वत्र खुलेआम मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा विकलाजात आहे. मात्र  ठोस कारवाई होत नसल्याने संशय व्यक्त होत आहे.
           तसेच भिवंडी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ मोठया कंटेनर मधून आलेला माल रोज वेग वेगळ्या ठिकाणी उतरवला जात असून या सर्व प्रकरणाची माहिती संबधित पोलीस स्टेशनला व संबधित खात्याला असून सुद्धा ठोस कारवाई होताना दिसत नाही.
           अश्याच प्रकारे प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तत्सम अन्न पदार्थाची छुप्या मार्गाने विक्री होत असल्याने नाशिक अन्न आणि औषध प्रशासनाने छापासत्र सुरू केले आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहआयुक्त संजय नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त उदय लोहकरे यांच्यासह पथकाने आडगाव परिसरातील खंडेराव मंदिरासमोरील मे. महालक्ष्मी ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकला.
           यावेळी मालक प्रशांत कचरू सावळकर हा उपस्थित होता. अधिकाऱ्यांनी पेढीची झडती घेतली असता 3 हजार 675 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा साठा विक्रीसाठी आढळला. पेढीच्या समोर उभी असलेल्या गाडीची तपासणी केली असता त्यात 45 हजार 789 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला.
          दरम्यान, अधिकाऱ्यांचा संशय बळावला असता पथकाने सावळकर यांच्या राहत्या घराची झडती घेतली. त्यात एक कोटी 4 लाख 280 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आढळून आला. या साठ्यात हिरा पान मसाला, विमल पानमसाला, राजनिवास पानमसाला, रॉयल ११७ सुगंधित सुपारी, व्ही वन सुगंधित सुपारी, नखरेली स्वीट सुपारी असा एक कोटी ५२ लाख ७४४ रुपये किमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. त्याचबरोबर ३० लाख रुपये किमतीचे वाहनदेखील जप्त करण्यात आले आहे. 
           नाशिकसह इतर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाकडून सातत्याने धडक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत लाखो कोटी रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा, वाहतुक आणि विक्री केल्याचे आढळून आल्यास 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...