Friday 28 July 2023

संभाजी भिडेंच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक, विधीमंडळात पृथ्वीराज चव्हाण यांनी केली अटकेची मागणी !!

संभाजी भिडेंच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक, विधीमंडळात पृथ्वीराज चव्हाण यांनी केली अटकेची मागणी !!
 
*योग्य ती कारवाई करू -- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

भिवंडी, दिं,२९, अरुण पाटील (कोपर) :
          करमचंद गांधी नव्हे तर एक मुस्लिम जमीनदार राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खरा बाप आहे, असे धक्कादायक विधान शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे संपादक संभाजी भिडे यांनी  गुरुवारी आयोजित केलेल्या सभेत केले होते. या विरोधात आता कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. भिडे हे नेहमी वादग्रस्त विधान करत असतात, हा बाहेर कसा फिरू शकतो त्या मुळे संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करा अशी मागणी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केली, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत भिडे यांच्यावर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.
          शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांची गुरूवारी सायंकाळी शहरातील बडनेरा मार्गा वरील जय भारत मंगलम् येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आणि त्यांचे वडील करमचंद गांधी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले.     
           त्या वेळी भिडे म्हणाले की, मोहनदास हे चारित्र्य संपन्न व शिलवान करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते त्या जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नी सारखा व्यवहार केला, असा दावा संभाजी भिडे यांनी केला होता.
           वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असलेले संभाजी भिडे यांची सभा उधळण्याचा प्रयत्न अमरावती येथील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी काल केला होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो महापुरुष शहीद झाले; मात्र हे भिडे स्वातंत्र्य दिनाला काळा दिवस म्हणून दुखवटा पाळण्याचे सांगतात. राष्ट्रीय ध्वज, संविधान, राष्ट्रगीत, महामानवांचा, महिलांचा वारंवार अपमान करून संपूर्ण भारतीयांच्या भावना दुखवतात. त्यामुळे समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करत आंबेडकरी संघटनांनी संभाजी भिडेंची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता.
          संभाजी भिडेंच्या अमरावतीच्या सभेतील खळबळजनक व्यक्तव्याचे अमरावतीत संतप्त पडसाद उमटले आहेत. संभाजी भिडे यांना अटक न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा काँग्रेसने इशारा दिला आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची पोलिसांकडे व्हिडिओ व ऑडिओ क्लिप उपलब्ध नाही. अमरावती पोलीस व गुप्तचर यंत्रणा का गप्प आहे, असा आरोप काँग्रेस कडून होत आहे.

1 comment:

  1. अश्या घाणेरड्या व राष्ट्र पूर्स्यावर बोळनाराऱ्या भिदेंचा जाहीर निषेध 😡 आता सरकार झोपेचे सोंग घेणार 😡

    ReplyDelete

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...