Sunday 30 July 2023

वयोवृद्धांच्या आधारकाठीसह मोफत आरोग्य शिबिर संपन्न !!

वयोवृद्धांच्या आधारकाठीसह मोफत आरोग्य शिबिर संपन्न !!

*भैरवनाथ जनसेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम*

                            (संस्थापक/ अध्यक्ष श्री राजुदादा सुर्यवंशी)

मुंबई, (शांताराम गुडेकर /संतोष गावडे) -

          अंधेरी पुर्व अंधेरीतील मरोळ विभागातील शिवसेना शाखा ८६ (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंतर्गत भैरवनाथ जनसेवा संस्थेच्या माध्यमातून रविवार दिनांक ३० जुलै रोजी संपूर्ण मरोळ विभागासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

           सदर शिबिरात तज्ञ डॉक्टरांकरवी नागरिकांच्या आरोग्याची योग्य तपासणी पूर्णतः मोफत करून आवश्यक औषधेही मोफत देण्यात आली. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, डोळ्यांचे आजार, आदी विविध आजारांच्या आणि साथीच्या विविध आजारांच्या अनुषंगाने तपासणी करून नागरिकांना त्याबाबतीत मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी ईसिजीची तपासणीही मोफत करण्यात आली. गंभीर आजारांचे निदान झालेल्या नागरिकांना पुढील उपचारांसाठी योग्य मार्गदर्शनही करण्यात आले.

          शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत गेल्या अनेक वर्षांपासून वर्षाकाठी किमान दोन वेळा सदर शिबिराचे नियमित आयोजन केले जाते. सतत बदलत राहणारे हवामान, दिवसागणिक तापमानात होणारी वाढ, वाढते प्रदुषण, आदींमुळे आज संपूर्ण जगभर नागरिकांना आरोग्यासंबंधी विविध समस्या भेडसावत आहेत, नागरिक विविध आजारांना बळी पडत आहेत. आपल्या देशात याचे प्रमाण त्यामानाने किंचित वरचे आहे. 

          आजवर ह्या शिबिरामुळे विभागातील हजारो नागरिकांना आपल्या आरोग्याच्या संबंधित उपचार करता आलेले आहेत. अनेकजण त्यांच्या लहानमोठ्या आजारातून कायमचे रोगमुक्त झालेले आहेत, तर अनेकांनी आजारांची तिव्रता कमी करण्यात यश मिळवलेले आहे.

          'जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा' हे ब्रिद लक्षात घेऊन आपण ह्या शिबिराचे आयोजन करीत आहोत आणि पुढेही ते करतच राहू, असे ह्या शिबिराचे प्रमुख आयोजक आणि भैरवनाथ जनसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजुदादा सुर्यवंशी यांनी सांगितले. ह्या एक दिवसीय  शिबिरासाठी किमान दोन महिने आधीपासूनच मेहनत घेऊन तयारी करावी लागते. ह्यकामी आपले चिरंजीव शुभम सुर्यवंशी यांचे मोलाचे योगदान लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि सर्व सदस्य यांचेही तेवढेच सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले 

          उद्घाटनप्रसंगी व संपूर्ण शिबिरादरम्यान शिवसेना युवासेना सरचिटणीस अमोल किर्तीकर, स्थानिक आमदार ऋतुजा लटके, अंधेरी विधानसभा संघटक प्रमोद सावंत, महिला विधानसभा संघटीका मंदाकिनी कदम, शाखाप्रमुख बिपिन शिंदे, महिला शाखा संघटिका सरिता रेवाळे, युवासेनेचे फ्लॉइड मिरांडा, विशाल चव्हाण, किरण पुजारी, निरपा तिरुवा, आलम सलमानी, उल्ल्हास चवाथे, आदी मान्यवर, इतर सर्व पदाधिकारी आणि शिवासानिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...