Wednesday 28 December 2022

एमआयडीसीत कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा खा.इम्तियाज जलिल यांचा आरोप...

एमआयडीसीत कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा खा.इम्तियाज जलिल यांचा आरोप...

माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई व नारायण राणे यांच्यावर केले गंभीर आरोप... उच्चस्तरीय चौकशी करण्याची केली मागणी

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि. २८ : 
शहरात नवीन उद्योग तर आणले नाही उलट चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत उद्योगासाठी दिलेल्या भुखंडाची खाजगी व रेसीडेन्स भुखंड करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई व नारायण राणे यांनी केला असल्याचा गंभीर आरोप पत्रकार परिषदेत केले आहे.
आज सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत ५१ भुखंडाचे आरक्षण बदलण्यासाठी प्रत्येकी दिड ते दोन कोटी रुपये घेण्यात आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशा भुखंडाची चौकशी करण्यासाठी बक्षी समीती सन २०१८ मध्ये नियुक्त करण्यात आली होती. अगोदरच्या उद्योग मंत्र्यांनी सुध्दा अशा प्रकारे भुखंडाचे आरक्षण बदलण्यासाठी निर्णय घेतले असल्याने नारायण राणे यांच्यावर सुध्दा त्यांनी पत्रकार परिषदेत आरोप केले आहेत. राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी नियुक्ती केल्यास अंदाजे एक हजार कोटींचा जमीन घोटाळा उघड होईल. दोषी असलेले तुरुंगात जातील. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये घोटाळ्यांची जणू मालिका सुरू असल्याचे दिसत आहे. सरकारने काही प्रकरणात एसआयटी चौकशीचे आदेश दिले. अशाच प्रकारे या प्रकरणात तपास करावा अशी मागणी त्यांनी राज्य सरकारला केली आहे.
यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...