Friday 30 December 2022

काव्यरत्नावली चौक ते गिरणा टाकी रस्त्याच्या डांबरीकरणाची महापौर सौ. जयश्री महाजन यांच्याकडून पाहणी !

काव्यरत्नावली चौक ते गिरणा टाकी रस्त्याच्या डांबरीकरणाची महापौर सौ. जयश्री महाजन यांच्याकडून पाहणी !

जळगाव दि ३०  :  गेल्या अनेक दिवसांपासून जळगावकर नागरिकांसह वाहनचालकांची रस्त्यांसंदर्भात होणारी गैरसोय आता टप्प्या-टप्प्याने दूर करणे सुरू झालेले आहे. 

त्याचाच भाग म्हणून शुक्रवार, दि.30 डिसेंबर 2022 रोजी  शहरातील मुख्य रस्त्यांतर्गत येत असलेल्या काव्यरत्नावली चौक ते गिरणा टाकी दरम्यानचा रस्ता डांबरमध्ये बीबीएम करुन डांबरीकरणाला सुरुवात झाली असता शहराच्या प्रथम नागरिक अर्थात महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका तसेच जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेची पाहणी करण्याच्या उद्देशातून तात्काळ दुपारी महापौरांनी सदर कामाच्या ठिकाणी भेट देऊन संपूर्ण रस्त्याच्या डांबरीकरणाचा आढावा घेतला. त्यात रस्ता डांबरीकरणाचे काम चांगल्याप्रकारे होत असल्याने समाधान व्यक्त केले. 

दरम्यान, यापुढेही आपण अशाच प्रकारे रस्त्यांच्या विविध कामांच्या ठिकाणी केव्हाही भेट देऊन गुणवत्तेसंदर्भात पाहणी करू. यावेळी कामात कोणताही हलगर्जीपणा केला जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर महापालिकेच्या माध्यमातून निश्चितपणे कारवाई होईल, असेही महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासमवेत महापालिकेचे शहर अभियंता संजय नेमाडे, साईट इंजिनिअर मनोज वानखेडे व ठेकेदाराचे सुपरवायझर व कामगार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !!

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !! मुंबई (शांताराम गुडेकर) :       ...