Friday 30 December 2022

वाघांबे कुणबी संघटना तर्फे शुक्रवार दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी मा. दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ले (पूर्व) येथे नमन चे आयोजन !

वाघांबे कुणबी संघटना तर्फे शुक्रवार दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी मा. दिनानाथ  नाट्यगृह विलेपार्ले (पूर्व) येथे नमन चे आयोजन !

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर ) :

          पर्शुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण भुमित अनेक कलांचा उगम होऊन बदलत्या काळानुसार त्या-त्या कला विकसीत झाल्या. त्यामध्ये कोकणचे खेळे अर्थात नमन या कलेतही अनेक बदल झाले. या कलेला शासनाकडून अनुदान मिळत नसले तरी पुर्वजानी ठेवलेली, जपलेली नमन ही कला रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यामधील गावात, वाडीत जतन केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील वाघांबे हे छोटेसे गाव. ८०% कुणबी समाज असलेल्या या छोट्याशा गावानेही पुर्वजानी ठेवलेला हा अनमोल ठेवा आजही जतन केला आहे.
           मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात कुणबी बांधव विखुरला गेला आहे.या समाजाला एकजूट करण्यासाठी कै. गंगाराम डिंगणकर व कै.धाकाजी निंबरे व सहकारीवर्ग यांनी १९९२ साली वाघांबे कुणबी संघटनेची स्थापना केली. या संघटनेने नमन हा उपक्रम हाती घेऊन मुली विविध क्षेत्रात पुढे याव्यात या उद्देशाने प्रथमच १९९३ साली नमन या कार्यक्रमात मुलींना सहभागी करून या कलेला एक नवा पायंडा पाडून दिला.आजही  संघटना वेळो वेळी आवश्यक उपक्रम राबवत असून नमन ही कला जोपासत आहे, विविधतेने नाटलेली ही एक अशी कला आहे, या कलेतून कलाकाराला आपल्यातले विविध गुण सादरीकरण करता येतात. नावीन्यपूर्ण असा हा कार्यक्रम वाघांबे कुणबी संघटना आयोजित नमन -नाट्यरूपाने शुक्रवार दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी मा. दिनानाथ  नाट्यगृह विलेपार्ले (पूर्व) येथे रात्रौ ०८:१५ वाजता आयोजित केलेला असून  गण, हास्याची कारंजे उडवणारी पण विचार करायला लावणारी हृदयस्पर्शी गौळण - गोकुळ झाले व्याकुळ आणि सम्राट रावण भाग - 2, रावणाचा घेतलेला शोध  आणि त्याला झालेला बोध असा हा लावीण्यपूर्व कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.
              निर्माता वाघांबे कुणबी संघटना (मुंबई), लेखक : मोहन गोविंद निंबरे, दिग्दर्शक: शांताराम ठोंबरे, नृत्य दिग्दर्शन कु. किर्ती निंबरे, गीतरचना- प्रविण करंबेळे, अजय घाणेकर, पार्श्वगायिका - कोकणची लोककला शक्ती-तुरा मधील नामांकित तुरेवाल्या शाहिर सौ.प्रिती भोवड- विर, पार्श्वगायक- प्रविण करंबेळे, नितीन निंबरे, हारमोनियम- सुनील करंबेळे, बुलबूल - मास्टर  अविनाश बसनकर, मृदुंग/ढोलकी- रमेश डाफळे, अक्षय वणे, वाघांब्यातील २५ यशस्वी कलाकारांसह, रंगभुषा- गंगाराम गोताड,विशेष सहकार्य-मोहन करंबेळे, गंगाराम अलीम, अनंत वणे, चंद्रकांत निंबरे, अनिल ठोंबरे, ओमकार मांडवकर, सुभाष ठोंबरे, अनंत गोताड आणि सर्व संघटना सदस्य तरी या कोकणच्या लोककलेचा कोकण भूमिपुत्रानी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !!

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !! कल्याण, प्रतिनिधी : जिजाऊ संघट...