अभ्युदय नगरमध्ये पोहचली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते "किशोरदादा गणाई" यांची "शिक्षणवारी" ,!
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते "किशोरदादा गणाई" यांच्या कल्याण ते कुलाबा संकल्प व्हीलचेअर शिक्षणवारीने भारतीय कम्युनिष्ट पक्ष अभ्युदय नगर शाखेला भेट दिली.
जेष्ठ कार्यकर्ते किशोरदा गणाई (जगताप) गेली चाळीस वर्षे शिक्षणापासून वंचित व शिक्षणबाह्य मुलीमुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचा शैक्षणिक विकास करण्यासाठी बागशाळा, फुटपाथ शाळा, वस्तीशाळा व महत्वाचे म्हणजे मैत्रकुल चालवतात, जे एकार्थाने आधुनिक गुरुकुल आहे, जे गेली ५ वर्षे कल्याण-भिवंडी रोडवर बापगाव येथे भाड्याच्या जागेत आहे, अशी माहीती मैत्रकुलच्या संचालक पुजा गाई यांनी दिली.
मैत्रकुल स्वतःच्या हक्काच्या जागेत सुरु करून बांधण्याकरता एक कोटीची गरज आहे त्या करता किशोरदा संकल्प व्हिलचेअर यात्रा शिक्षणवारी ६ ऑगस्ट २०२२ अर्थात 'हिरोशिमा दिवस" पासून सुरूवात करण्यात आली आहे.
गेली ५ वर्षे मैत्रकुल हे भाडेतत्त्वावर चालत आहे पण अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून मैत्रकुल आता स्वतःची जागा घेण्यासाठी तसेच याच जागेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे वाचनालय, तंत्रज्ञान खोली, लहान मुलांसाठी खेळणीघर, कलाकारांसाठी वेगळी जागा अशा विविध सुविधा करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी लागणारा निधी हा संकल्प व्हीलचेअर यात्रेच्या माध्यमातून आपल्या दारोदारी येऊन ५ हजार लोकांकडून प्रत्येकी २००० रुपयांच्या मदतीने उभा करण्याचा संकल्प किशोरदादा यांनी केला आहे.
हीच "शिक्षणवारी" 'भारतीय कम्युनिष्ट पक्ष अभ्युदय नगर कार्यालयाजवळ पोहचल्यानंतर त्यांचे जोषात स्वागत करण्यात आले. त्या प्रसंगी कॉ. विजय राणे यांच्या हस्ते वही पेन व शिक्षणवारीला खारीचा वाटा म्हणून आर्थिक मदत भारतीय कमुनिस्ट पक्ष अभुदय नगर शाखा सचिव कॉ. संजय खळे यांच्या हस्ते देण्यात आली. त्याप्रसंगी मुंबई सचिव मंडळ सदस्य कॉ. प्रसाद नारायण घागरे आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर सदर वारी अभ्युदय नगर ज्येष्ठ नागरिक संघ आणि अभ्युदय नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे निधी संकलनासाठी गेली.
स्वाभिमानी, स्वावलंबी, उच्चशिक्षीत, सामाजिक भान असलेले कृतीवंत विद्यार्थी घडवणाऱ्या मैत्रकुलला ५०० विद्यार्थ्यांच्या निवासाकरता, कल्याण ग्रामीण मध्ये स्वतःची २ एकर जागा घेण्याकरता १ कोटी हवेत म्हणून शिक्षणवारी गेली ४ महिने झाले तरी पावसात, उन्हात, थंडीवार्यात चालूच आहे.
मुंबईच्या आमदारांच्या क्षेत्रात वणवण फिरत पायलट टिम रोज मार्ग ठरवत आहे. अजून चार हजार साथींनी स्वतः वा मित्रपरीवार / संस्था मिळून किमान २००० रूपये दिल्यास १ कोटींचा संकल्प पुरा होईल.
बँकेचा तपशील:-
Chhatrashakti sanstha Bank of Baroda (For building fund only)
छात्रशक्ती संस्था बँक ऑफ बरोडा
Acount no. (खाते क्रमांक) 34910100008577
Ifsc code (आयएफएससी कोड) BARBOKHADAK (fifth character is zero)
जीपे ९०२९८९५१२० ॲड. पुजा बडेकर
कृपया चेक “छात्रशक्ती संस्था" या नावाने काढावा असे छात्रशक्ती संस्थेच्या मानद अध्यक्षा अॅड. पुजा बडेकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment