चाट पुचका रेस्टोरंन्टचे 'महापौर सौ.महाजन' यांच्या हस्ते उद्घाटन !
जळगाव, अखलाख देशमुख, दि ३१ : शहरातील समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज रोड येथे नव्याने स्थापित झालेल्या चाट पुचका रेस्टोरंन्ट आज शनिवार, दि.३१ डिसेंबर २०२२ रोजी जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका तसेच जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन झाले.
याप्रसंगी महापौर सौ.महाजन यांनी व्यावसायिक वाटचालीसाठी संचालकांना शुभेच्छा देत या कार्यक्रमाच्या औचित्याने आयोजित स्नेहमीलन सोहळ्यातही सहभाग नोंदविला. यावेळी ‘चाट पुचका ’ या रेस्टोरंन्ट चे संचालक व परिवार यांनी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांचे यथोचित स्वागत केले. या सोहळ्याला परिसरातील नागरिक व परिवाराचे आप्तेष्ट उपस्थित होते.
आपले परिवाराचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
ReplyDeleteविनोद नेवे व सौ शैला नेवे व साकळीकर परिवार
ReplyDeleteसंचालक चाट पुचका
ReplyDeleteआपले हार्दीक अभिनंदन
व शुभेच्छा
प्रशांत म नेवे & अंजली नेवे भुसावल
आपण दिलेल्या शुभेच्छा चा मनःपूर्वक स्वीकार,आपला विश्वास व प्रेम आमच्यावर सदैव असु ध्यान.याने निश्चितच आमचा आत्मविश्वास वाढेल 🙏
ReplyDelete