३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष स्वागतासाठी मुंबईतील समुद्र किनार्यांवर येणार्या जनतेच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या अतिरीक्त बसगाडया !
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शनिवार दिनांक ३१ डिसेंबर २०२२ च्या रात्री नववर्ष स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि मुंबईतील इतर समुद्र किनार्यांवर रात्रीच्या वेळी येणार्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीने विविध बसमार्गावर रात्री एकूण ५० जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास अधिक प्रमाणात बसगाड्या सोडण्यात येतील.
प्रवाशांच्या मदतीसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, जुहू चौपाटी, गोराई बीच तसेच चर्चगेट स्थानक (पूर्व) व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इ. ठिकाणी वाहतूक अधिकारी तसेच बसनिरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.
जनता संपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने बेस्ट उपक्रमाने उपलब्ध केलेल्या अतिरीक्त बससेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
No comments:
Post a Comment