Monday, 28 February 2022

ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे गाळेगाव येथील पथदिवे बंद !! "१२ दिवसापासून पथदिवे बंद असल्याने नागरिक त्रस्त"

ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे गाळेगाव येथील पथदिवे बंद !!

"१२ दिवसापासून पथदिवे बंद असल्याने नागरिक त्रस्त"


मोहोने, संदीप शेंडगे : ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे वार्ड क्र.१२ येथील पंचशील नगर, लालबहादूर शास्त्री नगर, अष्टगंध कॉम्प्लेक्स, रामजी नगर, विद्या नगर सोसायटी येथील पथदिवे बंद असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या बारा ते पंधरा दिवसांपासून येथील नागरिक रात्रीच्या वेळी रस्त्यावर उजेड नसल्याने अंधारातून ये- जा करत आहेत.

शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून पंचशील नगर पिठाची गिरणी रोड येथे 13.5 लक्ष निधी खर्च करून सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे परंतु ठेकेदाराने नागरिकांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता उद्घाटन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी जेसीबीच्या साह्याने खोदकाम सुरू केले या खोदकाम मध्ये अनेकांचे पिण्याचे पाण्याचे नळ सुद्धा बाधित झाले अनेकांचा पाणीपुरवठा खंडित झाला तसेच पथदिवे यांना होणारा विद्युत पुरवठा अंडरग्राउंड असल्याने तोही बादल झाला ठेकेदाराने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता कोणत्याही प्रकारची काळजी न घेता विद्युत पुरवठा खंडित करून नागरिकांना प्रचंड मनस्ताप दिला आहे या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. 

नुकत्याच शाळा कॉलेज महाविद्यालय सुरू झाले असून महाविद्यालयीन विद्यार्थिनी ट्युशन क्लासला जात आहेत त्यातच रात्रीच्या वेळी हे पथदिवे बंद असल्याने विद्यार्थिनींना अंधारातून जावे लागत आहे पथदिवे बंद असल्याने अनेक पालकांना आपल्या मुलांना ट्युशन, क्लासला सोडविण्यासाठी काम धंदे बंद करून जावे लागत आहे. अंधाराचा फायदा घेऊन रस्त्यावरील टवाळखोर पोरांकडून मुलींची छेडछाड होण्याची शक्यता असल्याने येथील पथदिवे तात्काळ सुरू करण्याची मागणी येथील महिलांनी केली आहे. पथदिवे बंद असल्याबाबत अ प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांना विचारले असता सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू असल्याने काही विभागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे ठेकेदाराकडून विद्युत पुरवठा सुरळीत करून घेण्याचे काम सुरू आहे लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत करून देण्यात येईल असे सुहास गुप्ते यांनी सांगितले आहे.

असे असले तरी गेल्या बारा दिवसापासून अंधारात असलेल्या विभागातील विद्युत पुरवठा कधी सुरळीत होतो ठेकेदारावर काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे

No comments:

Post a Comment

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !  *शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाची कारवाई ची मागणी* नालासोपारा, प्रतिनिध...