Tuesday 1 March 2022

शांति निकेतन पॉलिटेक्निक महविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस !! *उच्च व तत्रशिक्षणमंत्री उदय जी सामंत यांनी उपोषणास बसलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यां आंदोलनाची घेतली दखल*

शांति निकेतन पॉलिटेक्निक महविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस !!

*उच्च व तत्रशिक्षणमंत्री उदय जी सामंत यांनी उपोषणास बसलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यां आंदोलनाची घेतली दखल*


मुंबई, संदीप शेंडगे : शांति निकेतन पॉलिटेक्निक महविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर आणि कोकण विभाग अध्यक्ष यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा व्यवस्थापनास दिला आहे. 

मा.ज. मो. अभ्यंकर यांच्या आदेशाने मा. ज्ञानेश्वर म्हात्रे कोकण विभाग अध्यक्ष, शिवसेना जिल्हा अध्यक्ष शिरीष घरत, अरविंद नाईक उपाध्यक्ष, जगदीश भगत कार्याध्यक्ष मंगेश पाटील, कोषाध्यक्ष शिवसेना शहर प्रमुख यतीन देशमुख, उर्मिला प्रभू यांच्या नेतृत्वात आज शिक्षक सेना व शिवसेेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत शांति निकेतन पॉलिटेक्निक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. शिक्षकांनी त्यांच्या वर होत असलेल्या अत्याचार विरोधात पोटतिडकीने सर्व कार्यकर्त्यांना सांगितले.  आज पाच दिवस होऊन ही व्यवस्थापनाकडून कुठलीही विचारपूस करण्यात आलेली नाही. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ८ ते १० वर्षा पासून अर्धे वेतन देण्यात आलेले आहे. मागील ७ महिन्यापासून विना वेतन काम करीत आहेत. महिला कर्मचाऱ्यांना संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पूनम पवार व भाजपाचे आमदार यांचे स्विय सहाय्यक यांच्या कडून धमकविण्यात आले. त्यांना घाबवरण्यासाठी १० बाऊंसर नियुक्त केले आहेत. या विरोधात शिक्षक सेेनेने तीव्र निषेध नोंदविला आहे. 

या संदर्भातील सर्व माहिती महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री *मा. उदय जी सावंत* याना या संदर्भातील सर्व माहिती मा. उर्मिला ताई प्रभू आणि शिक्षक सेनेचे कोकण विभागाचे अध्यक्ष मा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली. त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. कोकाटे यांच्या सोबत चर्चा करून सदर शिक्षकांना योग्य तो न्याय देण्यात येईल याची हमी दिली आहे. आपल्या व्यस्त कार्यक्रमात असताना सुध्दा त्यांनी पुन्हा भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून थेट शिक्षकांकडून त्यांची व्यथा एकूण घेतली आणि शिक्षकांना येत्या तीन तारखेला त्यांच्या दालनात संस्था चालक, एमएसबीटीचे सर्व प्रमुख अधिकारी, शिक्षक सेनेचे पदाधिकारी आणि शिक्षकानं सोबत चर्चा करून शिक्षकांना संपूर्ण न्याय देण्याचे आश्वासन दिले. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष मा. ज. मो. अभ्यंकर  यांचे आज डोळ्याचे ऑपरेशन झालेले असताना सुध्दा ते सतत शिक्षक सेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे, जगदीश भगत, अरविंद नाईक आणि मंगेश पाटील यांच्या संपर्कात होते त्यांनी सुध्दा शिक्षकाना न्याय मिळून देण्यासाठी अल्पसंख्यांक आयोग तर्फे सदर व्यवस्थापनास समन्स जारी केलेले आहे. आणि शिक्षकांना न्याय मिळे पर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, शिवसेना, युवासेना शांत बसणार नाही. या पुढे आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा मा ज मो अभ्यंकर यांनी दिला आहे. 

या आंदोलनात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे पनवेल तालुका अध्यक्ष श्री. पाटोळे, शिवसेना शहर प्रमुख यतीन देशमुख, उपशहर प्रमुख ज्ञान भंडारी, विभाग प्रमुख किरण सोनवणे, शाखा प्रमुख श्याम खडकबान, उप विभाग प्रमुख अविनाश गव्हाणकर उपस्थित होते. जिथे प्रश्न गंभीर तिथे शिक्षक सेना खंबीर असल्याचे बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...