भारतात १२ प्रमुख ज्योतिर्लिंगे असून जाणून घेऊयात कुठे आहेत हे 12 ज्योतिर्लिंग.
(1) सोमनाथ ज्योतिर्लिंग: सोमनाथ ज्योतिर्लिंग हे केवळ भारताचेच नव्हे तर या पृथ्वीचे पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. हे मंदिर गुजरात राज्याच्या सौराष्ट्र भागात आहे.
(2) घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग: घृष्णेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराजवळील दौलताबाद जवळ आहे. याला घृष्णेश्वर किंवा घुष्मेश्वर असेही म्हणतात.
(3) रामेश्वरम ज्योतिर्लिंग: रामेश्वरम ज्योतिर्लिंग हे तमिळनाडू राज्यात रामनाथपुरम नावाच्या ठिकाणी आहे. भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असण्याबरोबरच हे स्थान हिंदूंच्या चार धामांपैकी एक आहे.
(4) नागेश्वर ज्योतिर्लिंग: नागेश्वर ज्योतिर्लिंग हे गुजरातच्या बाहेरील द्वारिका येथे आहे. धर्मग्रंथात भगवान शिव हे नागांचे दैवत असून नागेश्वराचा पूर्ण अर्थ नागांचा देव आहे.
(5) वैद्यनाथ ज्योतिर्लिंग: श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे झारखंड येथे असून हे सर्व ज्योतिर्लिंगांच्या गणनेत नववे स्थान असल्याचे सांगितले जाते. ज्या ठिकाणी भगवान श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे त्या ठिकाणाला वैद्यनाथ धाम म्हणतात .
(6) मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग: मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या काठावर श्रीशैल नावाच्या पर्वतावर वसलेले आहे. या मंदिराचे महत्त्व भगवान शंकराच्या कैलास पर्वतासारखेच असल्याचे सांगितले जाते.
(7) त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीच्या जवळ आहे. या ज्योतिर्लिंगाच्या सर्वात जवळ ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे.
(8) काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग: विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे भारताच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. उत्तर प्रदेशातील काशी नावाच्या ठिकाणी हे ठिकाण आहे.
(9) भीमाशंकर ज्योतिर्लिंग: भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सह्याद्री नावाच्या डोंगरावर आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला मोतेश्वर महादेव म्हणूनही ओळखले जाते.
(10) केदारनाथ ज्योतिर्लिंग: भगवान शंकराच्या १२ प्रमुख ज्योतिर्लिंगांमध्ये केदारनाथ ज्योतिर्लिंग देखील येते. हे उत्तराखंडमध्ये स्थित आहे. बद्रीनाथच्या वाटेवर बाबा केदारनाथचे मंदिर आहे.
(11) ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग: ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील इंदूर या प्रसिद्ध शहराजवळ आहे. हे ज्योतिर्लिंग ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी नर्मदा नदी वाहते आणि टेकडीभोवती नदी वाहते.
(12) महाकालेश्वर ज्योतिर्लिंग: मध्य प्रदेशची धार्मिक राजधानी म्हणल्या जाणाऱ्या उज्जैन शहरात हे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
( दि. ०१-०३-२०२२ : पर्व महाशिवरात्र ), अरुण पाटील भिवंडी, कोपर / +91 98220 87173
No comments:
Post a Comment