Sunday 27 February 2022

कल्याण बसस्थानकात "मराठी भाषा गौरवदिन" उत्साहात साजरा !! *कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक विजय गायकवाड*

कल्याण बसस्थानकात "मराठी भाषा गौरवदिन" उत्साहात साजरा !! *कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक विजय गायकवाड*


कल्याण, बातमीदार : आज दिनांक २७ फेब्रुवारी, २०२२ रोजी कल्याण बसस्थानकावर "मराठी भाषा गौरवदिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 


बसस्थानकावरील शिवस्मारकाजवळ जेष्ठ कविवर्य कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर (तात्या) यांच्या प्रतिमेचे पूजन कल्याण आगाराच्या पालक अधिकारी तथा यंत्र अभियंता (चा) सौ. स्मिता कुलकर्णी यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक विजय गायकवाड होते. बसस्थानकावर सौ. टापरे मॅडम यांनी सुंदर रांगोळी रेखाटली होती. याप्रसंगी बोलताना आगार व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी मराठी भाषा विविध साहित्यिकांनी व संतांनी समृध्द केली असून संत ज्ञानेश्वरांनी लिहीलेल्या पसायदानाला जगात तोड नाही , तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राजकोष करवून घेतला व मराठीला राजाश्रय दिला होता. 


आपण जन्मल्या बरोबर पहीला शब्द उच्चारला तो मराठी होता. भाषा हे फक्त विचार व्यक्त करण्याचे संवादाचे साधन नाही तर तो आपला गर्व आणि अभिमान आहे. मराठी भाषेला थोर साहित्यिकांनी व मराठी मातीत जन्मलेल्या अनेक संत, थोर समाजसुधारक व महात्म्यांनी मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. 


असे सांगून ज्ञानपीठ विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या विपुल साहित्यातून याची प्रचिती येते. कितीही मोठे संकट आले तरी, त्यातून "मोडून पडला संसार तरी मोडला नाही 'कणा' " अशा शब्दांत मराठी माणसाचे लढण्याचे नैतिक बळ वाढवणारे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे एकमेव श्रेष्ठ साहित्यिक होते.  मराठी साहित्य विपुल व समृद्ध आहे, पण "वाटस अप युनिव्हर्सिटी मुळे" वाचनाची आवड कमी होत असल्याची खंत व्यक्त केली. या प्रसंगी बसस्थानकावरील प्रवासी बांधवांना साखरपेढे व गुलाब पुष्प देवून "मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा" देण्यात आल्या. सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक श्री महेश भोये यांनी उपस्थितांचे स्वागत व आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानक प्रमुख श्री आपोतीकर, वरिष्ठ लिपिक सौ. देवयानी पाटील, मालती मॅडम, वाहतूक नियंत्रक मणिष म्हात्रे, भोये, सिनकर इत्यादी परिश्रम घेतले. कार्यक्रमास राप कर्मचारी अधिकारी व प्रवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...