Sunday 27 February 2022

"आगरी युथ फोरम" संचलीत "श्रीसंत सावळाराम महाराज" म्हात्रे स्मारक समिती ; "श्रीसंत सावळाराम महाराजां"चे स्मारक होणार ——खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे

"आगरी युथ फोरम" संचलीत "श्रीसंत सावळाराम महाराज" म्हात्रे स्मारक समिती ; "श्रीसंत सावळाराम महाराजां"चे स्मारक होणार   ——खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे


कल्याण, ऋषिकेश चौधरी : "संत सावळाराम महाराज" एक थोर विभूती होते त्यांचे नावाचे स्मारक आणि अध्यात्मपिठ कल्याण डोंबिवलीमधे उभारण्याची संधी मला माझ्या कारकिर्दित मिळत आहे हे मी माझे भाग्य समजतो. किर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ज्यांनी समाजामधे वैचारीक क्रांती घडवून आणली त्या आदरणीय संत सावळाराम महाराजांचे स्मारक आणि अध्यात्मपिठ उभारण्याचे आश्वासन नाही तर अभिवचन देतो तसेच हे स्मारक तुम्ही कल्पना केली असेल त्यापेक्षा अधिक भव्य दिव्य व्हावे यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करीन असे वचन 'खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे' यांनी वारकरी शिष्टमंडळाला दिले. 


संत सावळाराम महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये महाराजांचे यथोचित स्मारक उभारण्याची मागणी ठाणे— रायगड जिल्ह्यावासीयांमध्ये जोर धरु लागली आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातील किर्तनकार, प्रवचनकार, निष्ठावंत वारकरी त्याचप्रमाणे अनेक सामाजिक कार्यर्त्यांच्या आगरी युथ फोरमच्यावतीने बैठका घेण्यात आल्या. त्या बैठकांमधे श्रीसंत सावळाराम महाराजांचे स्मारक उभारण्याचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी आगरी युथ फोरम संचलीत "श्रीसंत सावळाराम महाराज" स्मारक समिती स्थापन करण्यांत आली आहे. 

वारकरी संप्रदयाचे माध्यमातून ज्यांनी समाजामध्ये वैचारीक क्रांती घडवून आणली. तोच विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावा महाराजांचे कार्य त्यांच्या पर्यंत पोहोचावे यासाठी महाराजांचे यथोचित स्मारक तथा अध्यात्मपिठाची उभारणी करण्यांत येणार आहे. महाराजांच्या स्मारक तथा अध्यात्मपिठ उभारणीसाठी मोठा भूखंड आणि मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता भासणार आहे. यास्तव ही स्मारक उभारणी स्मारक समिती आणि कल्याण— डोंबिवली महापालीकेच्या संयुक्त विद्यमाने व्हावी त्यासाठी मा. खासदार यांनी पुढाकार घ्यावा यासाठी आगरी युथ फोरम संचलीत संत सावळाराम महाराज स्मारक समितीचे पदाधिकारी आणि निष्ठावंत वारकरी किर्तनकार यांनी समितीचे 'अध्यक्ष श्री. गुलाबराव वझे' यांचे नेत्तृत्वाखाली 'मा. खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे' साहेबांची त्यांच्या डोंबिवली येथील कार्यालयात भेट घेतली. 

हे स्मारक म्हणजे फक्त महाराजांचा पुतळा उभारणे अपेक्षित नसून सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक कार्याचे केंद्र ठरावे. या अध्यात्मपिठामध्ये वारकरी संप्रदायिक अध्यात्मिक शिक्षण,संस्कृत पाठशाळा, संगीत शिक्षण, किर्तनकुल,योगविद्या प्रशिक्षण आणि विद्यार्थ्याच्या उपजत कलागुणांचा विकास घडवून आणण्याचा उदात्त हेतु असल्याचे आणि हे सर्व शिक्षण गुरुकुल पद्धतीने करण्याची योजना असल्याचे 'श्री.गुलाबराव वझे' यांनी सांगीतले. महाराजांच्या या स्मारकाची मांडणी एवढी आकर्षक आणि विलोभनिय असावी तसेच अध्यात्मपिठाचे कार्य एवढे शिस्तबद्ध असावे कि बाहेरच्या प्रांतांतील लोक कल्याण डोंबिवली मध्ये फक्त महाराजांचे स्मारक बघण्यासाठी यावेत असे आमचे प्रयत्न राहतील असेही 'गुलाबराव वझे' यांनी सांगीतले. 

तसेच स्मारक तथा अध्यात्मपिठ उभारणीसाठी "मा. पालक मंत्री श्री.एकनाथ शिंदे" साहेब यांचे सोबत कल्याण— डोंबिवली मधील आजीमाजी लोकप्रतिनिधी, वारकरी, किर्तनकार, प्रवचनकार, समाजसेवक, कल्याण—डोंबिवली महापालीकेचे अधिकारी आणि समिती सदस्यांची लवकरच एक संयुक्त  बैठक आयोजित करावी अशी विनंती करण्यांत आल्याचेही 'गुलाबराव वझे' यांनी सांगीतले. 

वारकरी शिष्टमंडळाचे मागणीला 'मा. खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे' यांचेकडुन सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने शिष्टमंडळ सदस्यांच्या,पदाधिका—यांच्या  चेह—यावर समाधान दिसून येत होते. याप्रसंगी आर्किटेक श्री.राजीव तायशेटे, समितीचे कार्याध्यक्ष ह.भ.प. चेतन महाराज, सरचिटणीस ह.भ.प. शरद पाटील, खजिनदार ह.भ.प. गणेश महाराज, श्री.पांडुरंग म्हात्रे, वारकरी संप्रदयातील ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. बाळकृष्ण महाराज, श्री. विजय पाटील, ह.भ.प. जनार्दन महाराज भिवंडी, ह.भ.प. प्रकाश महाराज, ह.भ.प.अनंता महाराज, युवा किर्तनकार ह.भ.प.विनित महाराज, ह.भ.प. विश्वनाथ कालण, ह.भ.प. संतोष काळण, ह.भ.प. गुणाजी मढवी, ह.भ.प. जे.डी. म्हात्रे, श्री. सुखदेव पाटील इत्यादी वारकरी मंडळी आणि मा. स्थायी समिती सभापती श्री. रमेश म्हात्रे, मा. नगरसेवक श्री. रवि पाटील, श्री. नितीन पाटील, डोंबिवली शहर प्रमुख श्री. राजेश मोरे, श्री. राजेश कदम,श्री. प्रकाश म्हात्रे, श्री. एकनाथ पाटील, श्री. सदाशिव गायकर, श्री. सदानंद थरवल आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...