Monday 28 February 2022

वाढदिवस हे केवळ निमित्त, सामाजिक कार्य करणे हा उद्देश- महेश देशमुख !!

वाढदिवस हे केवळ निमित्त, सामाजिक कार्य करणे हा उद्देश- महेश देशमुख !!


कल्याण(संजय कांबळे)मला सामाजिक कार्य, जनहितार्थ सेवा, लोककल्याणकारी योजना सर्व सामान्य लोकांसाठी राबविण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही, त्यामुळे आजचा माझा वाढदिवस केवळ निमित्त आहे, गोरगरीबांची कामे व्हावी हा मुळ उद्देश आहे, असे मत म्हारळ गावातील सामाजिक कार्यकर्ते महेश देशमुख यांनी नागरिकांनी आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या सोहळ्यात व्यक्त केले.


अगदी लहानपणा पासूनच गरिबीची झळ पोचल्याने गरिबी काय असते हे महेश देशमुख यांनी अनुभवलं होत. आपल्या लहान भावंडांना सांभाळत असताना आजुबाजूची सर्व भावंडं हि आपलीच आहेत ह्या भावनेने ते सर्वाना देखील तितक्याच प्रेमाने सांभाळत होता.


जसा जसा मोठा होत गेला तशी तशी त्याला समज येत गेली, घरामध्ये गरिबी असल्यामुळे अतिशय कमी वयामध्ये घरातली जबादारी त्याला घ्यावी लागली, कदाचित आपलं कोण हे लहानपणीच त्याला कळालं असावं.


उच्चशिक्षण घेऊन म्हारळ मध्ये त्याने प्रथम क्लासेसची सुरवात केली. आपल्या गावातील विद्यार्थ्यांना टाईपिंग क्लास करीता पायपीट करून कल्याण येथे जावे लागते असे निदर्शनास येताच त्याने त्या क्लास ची सोय देखील गावामध्ये करून दिली. सोबतच प्रिंटिंगचा जोड धंदा चालू केला असं एकही क्षेत्र नाही की ते याला माहीत नाही कारण परिस्थिती नुसार पडेल ते काम करणं हे त्याच्या स्वभावातच होते.


त्या मध्ये कुणाचं शाळेचं अँडमिशन असो, कुणाला नोकरी लावणे, कुणाला सर्टिफिकेट लागो नाही तर रेशनकार्ड लागो त्याच्या शिवाय कुणाचंही काम होत नव्हतं, पोलीस स्टेशन चा काही विषय असल्यास किंवा दवाखान्याचा काही काम असेल तर तो धावून येणारा तसेच सरकारी अधिकाऱ्यांना वाचा फोडणारा व ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांच्या समस्या मांडणारा, हा महेशच होता.


जिल्हा परिषद शाळा असो की गावातील  समस्या लढणारा फक्त हाच.


म्हारळ वासियांना धुळ आणि खराब रस्त्यास सामोरे जात असताना अतिशय स्वच्छ भावनेने रस्त्याचे काम त्वरित चालू व्हावे या करीता प्रशासनाच्या विरुद्ध गावात प्रथम उपोषणाला देखील हाच बसला होता आणि आपल्या ह्या गांधीगिरीने शासनाला त्याचं म्हणणं मान्य करावंच  लागलं.

महेश देशमुख हे जेव्हा प्रसिद्धीच्या झोतात आले, जेव्हा त्यांनी म्हारळ ग्रामपंचायत मधील करोंडोचा मुद्रांक घोटाळा उघडकीस आणला, यामुळे अनेकांना जेलवारी करावी लागली होती.

समाजसेवा म्हंटल तर विरोध प्रतिविरोध आलंच, काहींनी तर त्याला बदनाम करण्याचा विडाच उचलला पण त्यांना देखील तो पुरून उरला.

समाजसेवा काय हे त्याच्या कडुनच शिकावं.

समाज सेवक म्हणजे काय? तर जो जनहितासाठी आपली वेळ, संसार न बघता गरिब दिनदुबळ्यांच्या सेवेसाठी कायम हजर राहतो तो समाज सेवक ! आपल्या शिवशंभू मराठा प्रतिष्ठान म्हारळ यांना. प्रतिष्ठान मध्ये कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता अतिशय प्रामाणिक पणे काम केलं आणि प्रतिष्ठान ला उच्च शिखरावर पोचवलं ते महेश यानीच ! 

त्यामुळे त्यांचा वाढदिवस म्हणजे परिसरातील लोकासाठी एक उत्सवचं? म्हणून की काय, आजच्या दिवशी देखील  ई श्रम कार्ड, हेल्थ कार्ड, युनीव्हर्सल पास, आरोग्य शिबीर, आदी लोकोपयोगी कामे हाती घेतली, त्यांच्या या कामांचे कौतुक करण्यासाठी व त्यांना शुभेच्छा, आशीर्वाद देण्यासाठी भाजपाचे जेष्ठ नेते व  माजी नगराध्यक्ष गुलाबराव कंरजुले, म्हारळ ग्रामपंचायतीचे माझी सरपंच प्रमोद देशमुख, सदस्य योगेश देशमुख, लक्ष्मण कोंगिरे, केतन देशमुख, विकास पवार, यांच्या सह गावातील अनेक मंडळे व पदाधिकारी, बचतगटाच्या महिला, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...