Saturday 26 February 2022

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केलेल्या वक्ताव्याविरोधात मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात मुंबईत गुन्हा दखल !!

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केलेल्या वक्ताव्याविरोधात मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात मुंबईत गुन्हा दखल !!


भिवंडी, दिं,27, अरुण पाटील (कोपर) : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत काही विधाने केली होती. दिशा सालियनची बदनामी केल्याचं सांगत तिच्या आई-वडिलांनी महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर महिला आयोगाकडून नारायण राणे यांच्या विरोधात मालवणी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी एक खळबळजनक आरोप केला. या प्रकरणी शिवसेनेच्या नेत्या आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणें विरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली होती. महापौर किशोरी पेडणेकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिले होते. या पत्रात दिशा सॅलियन प्रकरणावरून नारायण राणे यांनी भाष्य केल्यामुळे कारवाई करण्याची मागणी केली होती. 

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने पूर्ण केला आहे. सीबीआयने दिशा सॅलियन प्रकरणाचाही तपास पूर्ण केला असून तिच्यावर बलात्कार झाला नाही, ती गरोदर सुद्धा नव्हती, असं तिच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. तिच्या आई- वडिलांनी सुद्धा या अहवालाला दुजोरा दिला आहे. एवढंच नाहीतर तिच्या आई-वडिलांनी मुलीच्या मृत्यूनंतरही बदनामी होत असल्याची तक्रार दिली आहे. तरीही नारायण राणे यांनी वारंवार पत्रकार परिषद घेऊन बलात्कार आणि हत्या झाल्याचे आरोप करत आहे, हे थांबवले पाहिजे, दिशाची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पेडणेकर यांनी पत्रातून केली आहे. 

१९ फेब्रुवारी रोजी नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी नारायण राणे म्हणाले, ८ जून रोजी दिशा सालियनची हत्या झाली. सांगितलं आत्महत्या केली. का करेल ती आत्महत्या? एकतर ती पार्टीला जात नव्हती. जबरदस्ती बोलवलं. त्यानंतर ती थांबत नव्हती, घरी जायला निघाली होती. त्यानंतर कोण-कोण होते? पोलीस संरक्षण कोणाला होतं? तिच्यावर वाईट कृत्य होत असताना बाहेर संरक्षण कोणाचं होतं. सालियनचा पोस्टमार्टम रिपोर्ट अजून आला नाही, का नाही आला? सात महिन्यात यायला हवा होता. दिशा सालियन ज्या इमारतीत राहत होती त्या इमारतीच्या रजिस्टरमधील ८ जूनची पाने कोणी फाडली? कोणाला इन्ट्रेस्ट होता. 

२२ फेब्रुवारी २०२२ रोजी नितेश राणे यांनी ट्विट करत दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले होते. नितेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं, दिशाला आठ तारखेच्या रात्री (८ जून २०२० – दिशा सालियानच्या मृत्यूचा दिवस) काळ्या रंगाच्या मर्सिडीजने पार्टीतून तिच्या मालाडमधील घरी नेण्यात आले होते. सचिन वाझेच्या मालकीचीही काळ्या रंगाचीच मर्सिडीज कार आहे, जी सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. ही तीच कार आहे का? वाझेला पोलीस दलात ९ जून रोजी पुन्हा रुजू करण्यात आलं होतं. कनेक्शन? 

मालवणी पोलीस स्टेशनची भूमिकाही पहिल्या दिवसापासूनच संशयास्पद आहे. आता त्यांना दिशा सालियन प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. दिशा सालियनसोबत राहणारा आणि ८ तारखेला उपस्थित असलेला रोहित राय पुढे येऊन का बोलत नाहीये? असा प्रश्नही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...