Friday, 25 February 2022

निघुण हत्या करणाऱ्या आरोपीस पाच तासात जेरबंद ; "खडकपाडा पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी"

निघुण हत्या करणाऱ्या आरोपीस पाच तासात जेरबंद ; "खडकपाडा पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी"


कल्याण, हेमंत रोकडे : शहाड येतील शेतात एका इसमावर कोणीतरी वार केले असुन सदर इसम मृत अवस्थेत पडला आहे. अशी प्राथमिक माहीती मिळताच पोलिस अधिकारी व अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळी पोहचले असता एका १६ ते १७ वर्षे वयाचे इसमास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून जिवे ठार मारल्याचे दिसून येत होते. सदर घटनास्थळ व आजुबाजुचा परिसर हा शेत तसेच झाडीझुडपे असणारा होते.


सदर ठिकाणी पोलिसांनी बारकाईने निरीक्षण करून प्राप्त झालेल्या मोबाईल फोन वरून मयत इसमाचे नाव निष्पन्न केले. त्यानंतर गोपनीय माहिती व तांत्रीक कौशल्याच्या आधारे आरोपी नामे शाहरूख यासीन शेख उर्फ इमरान वय २० वर्षे रा. आंबेडकर चौक, उंबर्णी रोड, बनेली, टिटवाळा जिल्हा ठाणे यास बनेली, टिटवाला परिसरातुन शिताफीने ताब्यात घेवून अटक केली. त्यावेळी मयत इसम व त्याचे मित्र यांचे त्याच परिसरात राहणारा आरोपी नामे शाहरूख शेख उर्फ इमरान यांचे सोबत आठ ते दहा दिवसापूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीताने त्या भांडणाचा राग धरून धारदार कोयत्याने फिर्यादी यांचा मुलगा याचे डोक्यावर व मानेवर वार करुन जिवे ठार मारले असल्याची माहिती समोर आली. सद रबाबत खडकपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ७२ / २०२२ भा.दं.वि.स. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण दत्तात्रय कराळे, पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ- ३, कल्याण सचिन गुंजाळ, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग उमेश माने पाटील, खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार, पोलीस निरीक्षक (प्रशासन) सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, पोलीस निरीक्षक नंदकुमार केंचे, अनिल गायकवाड व तपास पथकाचे अमलदार पोहवा एस एच. पवार, ठोके, डोमाडे, पोहवा देवरे, एस. पाटील, लोखंडे, श्रीरामे, बूधकर, कामडी, पोना खांबेकर, थोरात, बोडके, तागड, देसले, वारघडे यांनी आपले बातमीदारा मार्फत बातमी काढून व तांत्रीक तपास करून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

उत्कर्ष महाविद्यालयात शिक्षक गुणगौरव समारंभ संपन्न !

उत्कर्ष महाविद्यालयात शिक्षक गुणगौरव समारंभ संपन्न ! विरार, पंकज चव्हाण : विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित उत...