Tuesday 31 October 2023

महापालिकेतील प्रमुख रस्ते धुळरहित न झाल्यास सेक्रेट हार्ट शाळेचे प्राचार्य अंगातील शर्ट काढून पाण्याने रस्ते धुणार !!

महापालिकेतील प्रमुख रस्ते धुळरहित न झाल्यास सेक्रेट हार्ट शाळेचे प्राचार्य अंगातील शर्ट काढून पाण्याने रस्ते धुणार !!

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रमुख रस्ते १२ नोव्हेंबर पर्यत धुळरहित झाले नाही तर मी स्वतः अंगातील शर्ट काढून खडकपाडा येथील रस्ता पाण्याने धुणार यासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी, डाँवटर, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक आणि नागरिक हि सहभागी होणार आहेत असे सेक्रेड हार्ट शाळेचे संचालक अलबिन अँथोनी यांनी सांगितले, त्यामुळे या हटके आंदोलनाकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्तावर धुळीचे सामाज्य पसरले आहे, तर खड्डे ही पडले आहेत, तसेच डंपिंग ग्राउंड कचरा डेपो मुळे परिसरात दुर्गधी पसरते, याबाबत उपाययोजना कराव्यात याकरिता आंदोलन केले होते, महापालिका प्रशासनाने ३१ आँवटोबर रोजी चर्चेला बोलावले होते.

त्या प्रमाणे सेक्रेड हार्ट शाळेचे संचालक अलबिन अँथोनी व त्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ भाऊसाहेब दांडगे याची भेट घेतली व चर्चा केली, संचालक अलबिन अँथोनी यांनी सांगितले की महापालिका प्रशासनाने १२ नोव्हेंबर पर्यत प्रमुख रस्ते, खडकपाडा, प्रेम आँटो, वायले नगर तसेच कल्याण मुरबाड रोड हे महत्त्वाचे रस्ते धुळीत न्हाऊन गेले आहेत. यामुळे शालेय विद्यार्थी, लहान बालके, स्त्रिया, वयोवृद्ध यांना ब्लड कँन्सर झाले आहेत, यामध्ये अनेकाचा जीव गेला आहे. याबाबत वेळोवेळी महापालिकेकडे पत्रव्यवहार केला मात्र या भ्रष्ट अधिका-यांनी दखल घेतली नाही. देशाचे पंतप्रधान स्वच्छतेचे धडे देतात, स्वतः झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबवितात. मात्र या कल्याण डोंबिवली पालिकेने त्यांच्या स्वप्नांना कच-यात टाकले आहे, असा आरोप करुन आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, मी व माझ्या सोबत विधाथी, पालक, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक,, नागरिक असे पाचशे जण मिळुन पाण्याच्या बादल्या आणून अंगातील शर्ट काढून खडकपाडा येथील रस्ता संपूर्ण पाण्याने धुणार, असे सांगितले तसेच स्वच्छ भारत अभियनावर लाखो रुपये खर्च केला जातो त्याचा काय उपयोग, जिकडे तिकडे घाण दिसत आहे असे आरोप केले आहेत.

आजच्या या शिष्टमंडळात सेक्रेट हार्ट शाळेचे प्राचार्य अलबीन अँथोनी, कल्याण चे सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर, सेवानिवृत्त डेप्युटी सीईओ श्री नाईक, शाळेच्या श्रीमती अश्विनी मँडम, सना मँडम, संजिता मँडम, यासिम सर, भामरे सर आणि शाळेचे विद्यार्थी याचा समावेश होता.

दरम्यान सेक्रेट हार्ट शाळेचे प्राचार्य अलबीन सर यांनी आतापर्यंत जनहितार्थ जी जी आंदोलन केलेत, प्रश्न मांडले आहेत, ती यशस्वी केले आहेत, त्यामुळे हाही धुळरहित रस्त्याचा प्रश्न ते निकाली काढतील आणि लोकांना न्याय मिळवून देतील असे वाटते.

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...