Tuesday 31 October 2023

एकात्मिक बालविकास विभागाच्या खडवली बीटाचा मानिवली येथे महिलांचा मेळावा संपन्न, मान्यवरांची उपस्थिती !!

एकात्मिक बालविकास विभागाच्या खडवली बीटाचा मानिवली येथे महिलांचा मेळावा संपन्न, मान्यवरांची उपस्थिती !!

कल्याण (संजय कांबळे) : कल्याण पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्या खडवली बीटाच्या वतीने महिला मेळावा नुकताच मानिवली ग्रामपंचायत कार्यालया शेजारी मोठ्या उत्साहात साजरा झाला, यावेळी अनेक मान्यवरांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली व मार्गदर्शन केले.

याप्रंसगी व्यासपिठावर मानिवली च्या सरपंच सुकन्या गायकर, सदस्यां चंदाबाई गायकर, माया गायकर, माझी सरपंच चंद्रकांत गायकर, सामाजिक कार्यकर्ते संजय शेलार तर प्रमुख पाहुणे म्हणून हभप दिनेश तारमळे, अँड नंदिनी वडनेर, गुरवली ग्रामपंचायतीच्या सरपंच आशा दळवी, उपसरपंच, प्रशांत दळवी, सदस्य वैशाली मेहेर, स्वप्नील देशमुख, डॉ संदिप पाटील, मोस चे श्री मांजरे,आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रथम उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले, तर खडवली बीटातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. मुख्य सेविका रेखा भगत यांनी अंगणवाडीच्या साह्याने चालणारे विविध उपक्रमाची माहिती दिली. तर डॉ संदिप पाटील यांनी महिलांच्या आहार व आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. महिलांना सकस आहार घेणे किती महत्त्वाचे आहे याचे सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शरीरासाठी पाणी किती महत्त्वाचे आहे हेही सांगितले. अँड नदिंनी वडनेर यांनी महिलांच्या कायदेशीर कारवाई व हक्क, याबद्दल माहिती दिली .तर हभप दिनेश तारमळे यांनी आध्यात्मिक विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत गायकर यांनी ही मार्गदर्शन केले.

प्रशासनाच्या वतीने मुख्य सेविका उषा लांडगे, प्रज्ञा निपुर्ते, घरत मँडम उपस्थित होत्या, यावेळी मांडलेले खाद्यसंस्कृती व आकर्षक रांगोळीचे उपस्थितीतांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन खडवली च्या सेविका श्रीमती जाधव यांनी केले. या मेळाव्याला परिसरातील महिलांनी व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...