आंगवलीचा युवक अमृत कलश घेऊन नवी दिल्लीला रवाना !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
मेरी माती मेरा देश अभियाना अंतर्गत अमृत कलश संकलन समारोप कार्यक्रम आणि अमृत वाटिका उपक्रम नवी दिल्ली येथे दि.३१ ऑक्टोबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.या ऐतहासिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातून अनेक युवक,स्वयंसेवक, पदाधिकारी, सदस्य उपस्थित राहणार आहेत.मेरी माटी मेरा देश अंतर्गत जमविलेल्या मातीचा कलश घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुकाध्यक्ष श्री. रुपेशजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आंगवली गावचे सुपूत्र, युवा मोर्चा दक्षिण तालुका सरचिटणीस किशोर दत्ताराम करंबळे व त्यांचे सहकारी संगमेश्वर तालुका मधील युवा मोर्चाची टीम दिल्लीकडे कार्यक्रमासाठी रवाना झाली.ते "अमृत कलश" नवी दिल्ली येथे संकलित करणार आहेत.तसेच या संपूर्ण सोहळ्याची गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये नोंद केली जाणार आहे. आंगवली गावचे सुपुत्र या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत.
देशाच्या सेवेस हातभार लावणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील युवा मोर्चा अध्यक्ष प्रथमेश धामनस्कर आणि त्यांची टीमचे आंगवली भाजपा नेतृत्व,भाजपा उपाध्यक्ष संगमेश्वरचे श्री.विजय गुरव व ओबीसी मोर्चा चे तालुकाध्यक्ष अमित रेवाळे यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment