मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील - प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
डोंबिवली, सचिन बुटाला : आगामी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे सरकार केंद्रात आणण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहे. याअंतर्गत प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघात 2024 संकल्प दौरा आयोजित करण्यात आला होता. याच्या अंतर्गत आज रविवारी चंद्रशेखर बावनकुळे डोंबिवली येथे होते. यावेळी अप्पा दातार चौक येथे आयोजित संवाद कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी संवाद साधताना 527 वर्षे वाट पहात आहोत. किती पिढ्या यात गेल्या. विरोधकांनी आपल्याला सुनावले पण आता तारीख त्यांना पण समजली असेल असे बावनकुळे म्हणाले. यानंतर त्यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांना जवळ बोलवत लोकनेते असा त्यांचा उल्लेख केला तसेच प्रदेशाध्यक्ष यांनी कल्याण डोंबिवली मध्ये भाजप पदाधिकारी यांच्यासोबत शहरातील व्यापारी, व्यावसायिक यांची भेट घेतली. भाजपच्या वतीने यावेळी शक्तिप्रदर्शन देखील करण्यात आले.
यावेळी मराठा समाजातील एका व्यक्तीने एक मराठा लाख मराठा अशी घोषणा दिली असताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच यावर योग्य तो निर्णय देतील. सर्व पक्ष हे मराठा समाजाच्या बाजूने असून शिंदे यांच्या भूमिकेशी आम्ही सर्व सहमत असू असे सांगितले.
यावेळी कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण, कल्याण पूर्वचे आमदार गणपतशेठ गायकवाड, आमदार संजय केळकर, कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र (नाना) सुर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment