डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट !!
डोंबिवली, सचिन बुटाला : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना डोंबिवली शहर शाखेला सदिच्छा भेट दिली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्रदेशाध्यक्षांसोबत कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार गणपतशेठ गायकवाड, संजय केळकर, जिल्हाध्यक्ष नरेंद्र (नाना) सुर्यवंशी, कल्याण लोकसभा संयोजक शशिकांत कांबळे, मा. नगरसेवक राहुल दामले, मंदार हळबे, संदीप पुराणिक, इतर मान्यवर मा. नगरसेवक, पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे स्वागत शिवसेना शहर शाखेकडून करण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी २०२४ सालात कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे होणार आणि शिंदे लक्षावधी मतांनी पुन्हा निवडून येणार असे सांगून भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ सालात होणारी कल्याण लोकसभा मतदारसंघात युतीच्या वतीने डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे निवडणूक लढविणार असे आश्वासन उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले यामुळे संपूर्ण शहर शाखेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
बावनकुळे यांच्या हस्ते शहर शाखेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय ! या घोषणांनी शिवसैनिकांनी शहर शाखा दुमदुमवून सोडली. या प्रसंगी शिवसेनेचे उप-जिल्हाप्रमुख राजेश कदम, उपशहर प्रमुख राजेश मुणगेकर, कार्यालय प्रमुख प्रकाश शांताराम माने, शाखाप्रमुख वैभव राणे, ज्येष्ठ शिवसैनिक सुनिल मालणकर, झोपडपट्टी महासंघ प्रमुख हरिश्चंद्र कांबळे, महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे नामदेव भानुसे, पिराजी काकडे यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment