गिरनार नागरी निवारा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम संपन्न !
मुंबई, (शांताराम गुडेकर/मोहन कदम) :
गिरनार नागरी निवारा सहकारी गृहनिर्माण संस्था या संस्थेच्या माध्यमातून प्रतीवर्षा प्रमाणे सत्यनारायण पूजा महोत्सव साजरा करण्यात आला. पूजा महोत्सवचे हे २३ वे वर्ष होते.
यावेळी भव्य महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते.प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करत असताना विविध स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा, विद्यार्थी गुणगौरव -सत्कार सोहळा, त्याचबरोबर विविध डान्स व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या सर्व कार्यक्रमाला रहिवाशी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सोसायटीचे पदाधिकारी इमारत कार्यकारणी - लक्ष्मण जाधव(अध्यक्ष ), सुशीलकुमार शिंदे (सचिव ), कैलास गावडे (खजिनदार ), उत्सव समितीचे अध्यक्ष कैलास गावडे, सचिव सुजाता कांबरे, वैभव दा. कदम (खजिनदार) आणि कार्यकर्ते ,महिला मंडळ व मुला-मुलीने यामध्ये सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी, सदस्य व सभासद आणि रहिवाशी आणि हितचिंतक यांनी महत्वाचे सहकार्य केले याबद्दल सर्वाचे आभार मानले.या कार्यक्रमला अनेक मान्यवर यांनी भेट दिली. शेवटी आभार प्रदर्शनाने पूजा महोत्सवची सांगता करण्यात आली.
No comments:
Post a Comment