Monday, 30 January 2023

सहायक आयुक्त दिनेश वाघचौरे यांच्या आदेशाने गतिरोधक बनविण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात !

सहायक आयुक्त दिनेश वाघचौरे यांच्या आदेशाने गतिरोधक बनविण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात !

*पालक विद्यार्थी संघटनेच्या प्रयत्नांना यश*

मोहने, संदिप शेंडगे : शिवसृष्टी मोहने येथे वारंवार अपघात होत असल्याने गतिरोधक बसविण्याची मागणी पालक विद्यार्थी संघटनेने केली होती. 

या मागणीला यश आले असून प्रत्यक्ष गतिरोधक बसवण्याचे काम सुरू झाल्याने येथील रहिवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. 

शिवसृष्टी कॉम्प्लेक्स नवीन उड्डाणपूला जवळ सातत्याने अपघात होत होते येथील वाहन चालक वाहने अतिशय वेगाने चालवत असल्याने शिवसृष्टी कॉम्प्लेक्स रहिवाशांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत असे, लहान मुले वयोवृत्त व गरोदर स्त्रियांना येथून ये जा करणे कठीण झाले होते. 

नितीन राजगुरू यांनी ही बाब पालक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सचिन बोराडे, सेक्रेटरी आनंद सोनवणे, सदस्य राजू गायकवाड, पत्रकार संदीप शेंडगे यांच्या निदर्शनास आणून दिली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे यांच्याकडे पालक विद्यार्थी संघटनेने तात्काळ पत्र व्यवहार करून गतिरोधक बसविण्याची मागणी केली. 

सहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे यांनी मागणीची तात्काळ दखल घेतली तसेच सहाय्यक यांना गतिरोधक बसविण्यास सांगितले. सहाय्यक अभियंता बोरसे यांनी तात्काळ गतिरोधक बसविण्याची प्रक्रिया सुरू केली आणि आज प्रत्यक्ष कामास सुरुवात होऊन गतिरोधक बसविण्यात आले तात्काळ गतीरोधक बसविल्याने रामचंद्र आढाव, प्रकाश जोशी, एम डी मडीवाला, महादेव मोकाशी यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे, साहाय्यक अभियंता नितीन बोरसे तसेच पालक विद्यार्थी संघटनेचे आभार व्यक्त केले.




No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...