Sunday 29 January 2023

भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागात बोगस अपिलीय सुनावणी जनतेची फसवणूक !

भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागात बोगस अपिलीय सुनावणी जनतेची फसवणूक !

भिवंडी, मनोहर शिंदे : भिवंडी सार्वजनिक बांधकाम उपविभागात माहिती अधिकार अधिनियम कायद्याचे उल्लंघन करून, आर्थिक घोटाळे उघडकीस येऊ नये यासाठी उपविभागीय अभियंता श्री.एस.डी.चौधरी यांना अधिकार नसतानाही अपिलीय सुनावणी घेऊन, माहिती अधिकार कार्यकर्ते पांडुरंग कुंभार यांना अपमानास्पद वागणूक देऊन हाकलून देण्यात आले व त्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे.

दिनांक २६ मे २०२२ च्या शासन निर्णया नुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागात उपविभागीय अभियंता हे जनमाहिती अधिकारी असून विभाग कार्यालयातील कार्यकारी अभियंता हे नियमाप्रमाणे प्रथम अपिलीय अधिकारी आहेत. असे असतानाही आर्थिक घोटाळ्यांची माहिती द्यावी लागू नये व थातूरमातूर उत्तरे देऊन अपिल व माहिती अधिकार अर्ज निकाली काढता यावा यासाठी बोगस अपिलीय सुनावण्या घेऊन शासन निर्णयाला व आदेशाला केराची टोपली दाखवली गेली आहे.

पांडुरंग कुंभार हे अपिलीय सुनावणी साठी भिवंडी उपविभागात गेले असता त्यांना उपविभागीय अभियंता  एस.डी. चौधरी यांनी अरेरावीची भाषा वापरून अपमानित करून हाकलून देण्यात आले.

एवढेच नाहीतर असंवैधानिक भाषा वापरली असा ठपका ठेऊन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. संबंधित घटणे विरूद्ध कुंभार यांनी वरिष्ठ कार्यालयास ठाणे विभाग क्रमांक १ कार्यकारी अभियंता पाटील यांना वारंवार रितसर तक्रार देऊनही जाणिवपूर्वक चौधरी यांना पाठीशी घालत गैरप्रकार दाबण्याचा आटोकाट प्रयत्न केला. व उलटपक्षी कुंभार यांचेवरच खोटे व बिनबुडाचे आरोप केले.

या संदर्भात पांडुरंग कुंभार यांनी दिनांक १५ डिसेंबर २०२२ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृह ठाणे समोर एकदिवसीय उपोषण देखील केले.

या नंतर कुंभार यांनी उपविभागीय अभियंता एस.डी.चौधरी यांना लिगल नोटीस देखील पाठवली पण यावर देखील एक महिना उलटून कोणतेही उत्तर संबंधित कार्यालयाकडून व चौधरी यांचे कडून देण्यात आले नाही.

भिवंडी सार्वजनिक बांधकाम उपविभाग व ठाणे विभाग क्रमांक १ हे आपले आर्थिक घोटाळे उघड होऊ नयेत यासाठी वरील गैरप्रकार करत आहेत व संबंधित फसवणूक करणाऱ्या अधिकार्याची चौकशी लागून त्यांच्यावर फसवणूकीचे गुन्हे दाखल व्हावेत व त्वरीत निलंबनाची कारवाई केली जावी अशी मागणी पांडुरंग कुंभार व प्रकाश संकपाळ हे करत आहेत.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...