Saturday 28 January 2023

प्रजासत्ताक दिनी उत्साहात राष्ट्रध्वज वंदन !

प्रजासत्ताक दिनी उत्साहात राष्ट्रध्वज वंदन !

* खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम सादर

बुलडाणा, प्रतिनिधी : दि. 26 : प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापनदिनी आज दि. 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.15 वाजता जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या हस्ते पोलिस कवायत मैदान येथे राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले.

यावेळी आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गौरवी सावंत, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक शामला खोत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी, पोलिस उपअधीक्षक गिरीश ताथोड यांच्यासह विरमाता, विरपिता, विविध विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

राष्ट्रध्वज वंदनानंतर डॉ. तुम्मोड यांनी परेड निरीक्षण केले. पोलिस दल, होमगार्ड, राष्ट्रीय छात्र सेना, राजीव गांधी सैनिकी शाळा, मुलींची सैनिकी शाळा, सेंट जोसेफ शाळा, पोलिस बँड पथक, श्वान पथक, मोटार परिवहन विभाग यांच्या परेड संचलनानंतर त्यानंतर कृषि विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग, नगर विकास शाखा, सामाजिक वनीकरण विभाग, निवडणूक विभाग यांच्या चित्ररथाने मार्गक्रमण केले.

यावेळी सॅन्डो बटालियनमध्ये कार्यरत असताना शहिद झालेले कैलास पवार यांच्या विरमाता उज्ज्वला भारत पवार यांना ताम्रपट देऊन गौरव करण्यात आले. तसेच प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस दलातील पंकज सपकाळे, मोहम्मद शफीक अब्दुल रहिम, केशव नागरे, गजानन नाटेकर, शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता प्राप्त श्रीनिल बेलोकार, अदिती राणे, हर्ष कुंभारे, आदिनाथ इंगळे, वृंदा राठी, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. रवी शिंदे, डॉ. यास्मिन चौधरी, एस. जी. सोळंकी, कैलास बेंडवाल, आयुष्मान भारतच्या डॉ. रिया चोपडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे अविनाश महाले, फुल सिंह, धीर वाकोडे, पराग गवई, जिल्हाधिकारी कार्यालयाचे श्रीकांत हाके यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी बाल शिवाजी कॉन्व्हेंट, कराटे प्रशिक्षण केंद्र, महिला स्वसंरक्षण स्वयंसिद्धा, मर्दाणी खेळ, शिवाजी विद्यालय, शारदा कॉन्व्हेंट, एडेड हायस्कूल, मौलाना आझाद उर्दू हायस्कूल, उर्दू हायस्कूल,भारत विद्यालय, प्रबोधन विद्यालय, श्री. शिंदे गुरूजी कन्या विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, रूखाबाई कन्या विद्यालय, सेंट जोसेफ हायस्कूल, सहकार विद्या मंदिर यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे आहारतज्ज्ञ साहेबराव सोळंकी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शहरातील गणमान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली होती.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...