*श्री आदि जीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतिने* व
*जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था* यांच्या सहकार्याने नालासोपारातील दिव्यांग बांधवांना मोफत व्हिल चेअर व मोफत सायकल वाटप कार्यक्रम संपन्न...
दिव्यांग व्यक्तींना दररोज विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्याकडे योग्य साधने उपलब्ध नसल्याने त्यांना अनेकदा दुखापती होत असतात.
दिव्यांग नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत मिळणाऱ्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष केले जातं. असं असताना नालासोपारा शहरात भव्य असा ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांना आवश्यक त्या साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दिव्यांग बांधवांनाही सक्षम करून त्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिजाऊ संस्था मदत करत असते.
यावेळी श्री आदि जीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतिने व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे स्वयंसेवक अर्चना पाटील व अमित नाईक यांच्या सहकार्याने दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला....
No comments:
Post a Comment