Thursday 29 June 2023

कल्याण तालुक्यात पावसाचे धुमशान, नदी नाले तुंडूब, नालेसफाईची पोलखोल, अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर !

कल्याण तालुक्यात पावसाचे धुमशान, नदी नाले तुंडूब, नालेसफाईची पोलखोल, अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर !

कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या दोन तीन दिवसापासून कल्याण तालुक्यात पावसाचे धुमशान सुरू असून यामुळे कोरड्या पडलेल्या नद्या, नाले तुंडूब भरून वाहू लागले आहेत. या पावसामुळे कल्याण डोंबिवली शहरासह ग्रामीण भागातील नालेसफाईची पोलखोल केली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावरुन वाहत होते. तर सिमेंटच्या रस्त्यावर चिखल झाल्याने बहुतांश मोटारसायकल स्वार घसरुन पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

कित्येक दिवस सर्वजण उकाड्याने हैराण झाले होते. प्रत्येक प्राणी पावसाची अतूरतेने वाट पाहत होता. अखेरीस गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाने चांगली सुरुवात केली आहे. आतापर्यंत १५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कोरड्या पडलेल्या तसेच तळ गाठलेल्या काळू, उल्हास, बारवी, भातसा नद्या तसेच अनेक नाले, ओहळ, तुंडूब भरून वाहत आहेत. मुंबई वडोदरा एक्स्प्रेस च्या बाजूला असलेले शेताना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनखरपाडा, रुदा, आपटी फाटा, गोवेली, कांबा, वाघेरापाडा, येथील नाले दुथडी भरून गेले आहेत, अनेक ठिकाणी बिल्डर ने भरणी केल्याने ते पाणी रस्त्यावर आले आहे.

वरप येथे बिल्डर ने खोदून ठेवलेल्या खड्ड्यात १५/२० फुटापर्यंत पाणी भरल्याने ते धोकादायक ठरू शकतात. कल्याण डोंबिवली  टिटवाळा,शहरासह ग्रामीण भागात नालेसफाईची कामे झाल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाची या पावसाने पोलखोल केली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर गटारगंगा अवतरल्याचे चित्र दिसत होते. कल्याण मुरबाड रस्त्यावर म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान सिमेंट काँक्रीटीकरण चिखल झाल्याने,पावशेपाडा येथे डोंगरातून येणारे पाणी सरळ या रस्त्यावर येत असल्याने तसेच अनेक ठिकाणी रस्त्याचे अर्धवट काम झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

उल्हास नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून येत असल्याने गडूळ पाण्याच्या जागी ही वनस्पती च सर्वत्र दिसत आहे. असे असलेतरी वळगणीचे मासे पकडण्यासाठी तरुणांनी वलावर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दुपार पासून पावसाने उघडिप दिल्याने लोक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे भविष्यात मुसळधार पाऊस पडला तर काय होईल याचा अंदाज येवू शकतो.

No comments:

Post a Comment

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !!

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !! चोपडा, प्रतिनिधी.. गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असल...