Friday 30 June 2023

कल्याण तालुक्यातील कुंदे ग्रामपंचायत हद्दीतील 'आरोग्य केंद्र, उद्घाटनाविना दोन वर्षे पडून, दारे खिडक्या चोरीला जाण्याची शक्यता ?

कल्याण तालुक्यातील कुंदे ग्रामपंचायत हद्दीतील 'आरोग्य केंद्र, उद्घाटनाविना दोन वर्षे पडून, दारे खिडक्या चोरीला जाण्याची शक्यता ?

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या मुलभूत सोईसुविधा मिळाव्यात यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील कुंदे ग्रामपंचायत हद्दीत दानशुर शेतकरी लक्ष्मण गोविंद देवकर यांनी दान दिलेल्या १० गुंठे जागेवर प्रशस्त असे आरोग्य उपकेंद्र बांधण्यात आले. याकरिता जवळपास ९७लाख रुपये खर्च करण्यात आला. या वास्तूला आज  दोनते अडिज वर्षे होत आली असून अद्यापही त्याचे उद्घाटन न झाल्याने हे केंद्र वापराविना तसेच पडून आहे. याच्या आजूबाजुला झाडेझुडपे गवत, उगवले आहे, तसेच याचे दरवाजे खिडक्या चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर माझ्या जिवंतपणी याचे उद्घाटन व्हावे व माझ्या लोकांना आरोग्य सोईसुविधा मिळाव्यात अशी इच्छा जागा दान दिलेले वयोवृद्ध लक्ष्मण गोविंद देवकर या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे पावसाळ्यात विविध साथीचे आजार उद्भवू शकतात.या करिता हे केंद्र सुरू होणे गरजेचे आहे.

कल्याण तालुक्यात ३प्राथमिक आरोग्य केंद्र, एक ग्रामीण रुग्णालय आणि १८ उपकेंद्र आहेत. परंतु झपाट्याने वाढत असलेल्या लोकसंख्येसाठी ही खुपच अपुरी पडतात, प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी गोवेली ग्रामीण रुग्णालय अथवा मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर येथे यावे लागते, कधीकधी वेळेवर प्राथमिक उपचार न मिळाल्याने पेंशटला जीव घमावण्याची वेळ आलेली आहे.

हे टाळण्यासाठी मुरबाड विधानसभा मतदार संघाचे आ. किसन कथोरे यांच्या पुढाकाराने व प्रयत्नांने मामणोली जवळील कुंदे ग्रामपंचायत हद्दीत प्रशस्त असे उपकेंद्र बांधण्याचे निश्चित झाले. गावातील दानशूर शेतकरी लक्ष्मण गोविंद देवकर यांनी याकरिता १० गुंटे जमीन दान दिली, गावातील अनेक अडचणी, अडथळे, राजकारण यांना तोंड देत अखेरीस २०१९ हे उपकेंद्र बांधून तयार झाले.शौचालय, बांथरुम, किचन, आदी सोईसुविधा यामध्ये करण्यात आल्या आहेत.  या करिता सुमारे ९७ लाखाच्या आसपास खर्च झाला.या उपकेंद्रांचा बांगरवाडी, खंडवीवाडी, दहिवली, आडिवली, मामणोली, कुंदे, कोलम, केळणी, म्हसरोंडी, बापसई, नवगाव आदी गावातील १०/१५ हजार नागरिकांना फायदा होणार होता. परंतु शासकीय अनास्था, टक्केवारी, राजकारण, हेवेदावे यामुळे या उपकेंद्राची वाईट अवस्था झाली आहे. अर्धवट काम, स्वच्छतेचा अभाव, झाडेझुडपे, गवत वाढलेले, यामुळे हे नवीन उपकेंद्र आहे यावर विश्वास बसत नाही. काही थोडेफार राहिलेली कामे पुर्ण केली तर ग्रामीण जणतेला आरोग्यासाठी इतरत्र धावपळ करावी लागणार नाही. हे लक्षात घेतो कोण? शासकीय अधिकारी कागदी घोडे नाचवत आहेत, तर लोकप्रतिनिधी ना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे'गतिमान सरकार, वेगवान निर्णय, अशी जाहिरातबाजी करणाऱ्या 'मायबाप, सरकारने लाखो रुपये खर्च करून बांधून तयार असलेल्या या उपकेंद्राचे तेवढ्याच वेगवान पणे उद्घाटन केले तर गरीब 'बिचा-या जनतेला ऐन पावसाळ्यात आरोग्य सेवा मिळतील__

प्रतिक्रिया__

*किसन कथोरे (आमदार, मुरबाड विधानसभा)
कुंदे ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण व ठेकेदाराचा हलगर्जीपणा यामुळे काही काम बाकी आहे हे पुर्ण करून लवकर उद्घाटन करण्यात येईल.

*डॉ, भारत मासाळ (तालुका वैद्यकीय अधिकारी,)
लाईट व पाणीपुरवठा ही सोय झाल्यानंतर ते ताब्यात घेऊन तेथे उपकेंद्र सुरू करता येईल.

*लक्ष्मण देवकर (जागा दान देणारे शेतकरी, कुंदे)
माझ्या परिसरातील लोकांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून मी १० गुंठे जागा दिली, बांधकाम ही पुर्ण झाले मात्र, उद्घाटन न झाल्याने ते पडून आहे. याचे वाईट वाटते.

No comments:

Post a Comment

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !!

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !! चोपडा, प्रतिनिधी.. गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असल...