Friday, 30 June 2023

मा. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्था वर केली टिका !!

मा. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्था वर केली टिका !!



पुणे, प्रतिनिधी : राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. केली. राज्यातील महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुलींवर हल्ले करुन त्यांच्या हत्या केला जात आहेत. जातीय, धार्मिक सांप्रदायिकतेचे वातावरण निर्माण करुन दंगली घडू लागल्या आहेत. 

राज्यात जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत महिला व मुलींच्या बेपत्ता होण्याच्या 6 हजार 889 घटना घडल्या आहेत. तसेच पुण्यात मागील दोन आठवड्यांपासून दोन थरारक घटना घडल्या. एमपीएससी परीक्षेत राज्यातून तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार या मुलीची राजगडावर हत्या करण्यात आली. सदाशिव पेठेत भररस्त्यात एका तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला. यांसारख्या प्रकरणांवरुन राज्यातील महिला असुरक्षित असल्याची बाब पुढे आली आहे.

राज्याचे उमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाकीची वक्तव्य करण्याऐवजी मुली आणि महिलांच्या संरक्षणासाठी उपाय केले पाहिजेत, असा टोलाही पवार यांनी लगावला आहे.

No comments:

Post a Comment

न्हावा ग्रामस्थांना विमानतळ प्रकल्पात नोकरीत प्राधान्य मिळणे आवश्यक !!

न्हावा ग्रामस्थांना विमानतळ प्रकल्पात नोकरीत प्राधान्य मिळणे आवश्यक !! ** आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे मत उरण ...