Monday, 27 September 2021

आंबिवली बल्याणी मार्गावर रिक्षाचा अपघात ; 'ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रिक्षा चालकासह एक प्रवासी जखमी' !! *दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी*

आंबिवली बल्याणी मार्गावर रिक्षाचा अपघात ; 'ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रिक्षा चालकासह एक प्रवासी जखमी' !!

*दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी*


मोहोने : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आंबिवली बल्याणी मार्गावर रिक्षाचा अपघात झाला असून यात रिक्षा चालकासह एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.

रिक्षाचालक कपिल गायकर है प्रवासी घेऊन आंबिवलीच्या दिशेने जात होते रस्त्याला प्रचंड मोठमोठी खड्डे पडल्याने अंधारातून वाट काढत रस्त्याने जात होते. नायलॉन प्लांट जवळ एन आर सी कंपनीचे भिंत बांधण्याचे अदानी समूहाच्या ठेकेदारांकडून काम सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रीट पावडर टाकण्यात आली होती. रस्त्यावर पथदिवे नसल्याने खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्यावर टाकलेल्या ग्रिट वरून गाडी घसरून अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक कपिल गायकर यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून सहप्रवासी सद्दाम शेख त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

या अपघातास कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार असून वेळीच रस्त्यांची डागडुजी केली असती तर असा अपघात झालाच नसता मी अनेकदा पत्रव्यवहार करून रस्त्याची डागडुजी करण्याकरिता प्रशासनाला कळविले आहे परंतु प्रशासन दखल घेत नसल्याने हा अपघात झाला असल्याचे "नगरसेविका नमिता मयुर पाटील" यांनी सांगितले आहे. 

असे असले तरी रस्त्यावर पडलेल्या खड्डे वाचवावे की ठेकेदाराने रस्त्यावर कामासाठी टाकलेली ग्रिट वाचवावी या गोंधळात हा अपघात झाला असून या अपघातात भिंत बांधणारा ठेकेदार जबाबदार आहे असे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.

या अपघाताबाबत 'अ' प्रभाग क्षेत्रातील 'सहाय्यक उपायुक्त राजेश सावंत' यांना विचारले असता भिंत बांधण्याच्या कामात सुरक्षा उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी न केल्यामुळे संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सावंत यांनी सांगितले आहे.

रात्रीच्या वेळेस येथील रस्त्यावर पथदिवे बंद असल्याने रिक्षा चालकासह गोरगरीब पायी चालत जाणाऱ्या नागरिकांचे अतिशय हाल होत असून पथदिवे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

येत्या पंधरा दिवसात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आंबिवली बल्याणी टिटवाळा रस्त्याची डागडुजी न केल्यास तसेच शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वार्ड क्रमांक ११ च्या "नगरसेविका नमिता मयुर पाटील" यांनी प्रशासनाला दिला आहे.

रिक्षाचालकांनी टिटवाळा पोलिसांना घटनास्थळी बोलावून पंचनामा करण्यास सांगितले असून संबंधित भिंत बांधणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी रिक्षाचालकांनी केली आहे.

गेंड्याची कातडी ओढून झोपलेले प्रशासन येत्या पंधरा दिवसात रस्त्यांवरील खड्डे बुजवितात की नाही याकडे 'अ' प्रभाग क्षेत्रातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...