Thursday, 30 September 2021

स्व. विजय खांबे यांच्या कुटुंबियांना न्यू इंग्लिश स्कुल दमामे, माजी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात !

स्व. विजय खांबे यांच्या कुटुंबियांना न्यू इंग्लिश स्कुल दमामे, माजी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात !


कोकण - ( दिपक कारकर ) :

स्वतःच जीवन जगता-जगता दुसऱ्याच्या दुःखात सामील होण्याच्या माणुसकीचे दर्शन माजी विद्यार्थ्यांच्या हातून घडले आहे.नुकतीच घडलेली दुःखद घटना म्हणजे दापोली तालुक्यातील भडवळे ( देऊळवाडी ) गावचा तरुण विजय खांबे ( वय - ३२ ) यांचं काही महिन्यांपूर्वी आकस्मिक निधन झालं. हाताला मिळेल ते काम करून आपला कौटुंबिक उदरनिर्वाह करणारा विजय आपल्या प्रेमळ, मेहनती स्वभावाने वाडीत सर्वांचा प्रिय होता. मात्र त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटूंबियांवर मोठं दुःख कोसळले, घरचा कर्ता-कमविता फार कमी वयात कायमचाच निघून गेल्याने हे दुःख सहन न होण्यासारखेच होते. विजय यांच्या कुटुंबातील असणारी त्यांची पत्नी, १ वर्षाचा मुलगा, आई, भाऊ आणि बहिण असा त्यांचा परिवार आहे. या कुटूंबियांना कर्तव्यनिष्ठ भावनेतून मदतीचा हात देण्यासाठी न्यू इंग्लिश स्कुल, दमामे या विद्यालयाच्या सन - २००६ च्या इ.१० वी तुकडीतील माजी विद्यार्थ्यांनी ₹ १०,००० / रक्कम जमा करून कुटुंबियांना सुपूर्त केली. हा उपक्रम करताना माजी विद्यार्थी प्रशांत कदम, प्रदिप खांबे, शंकर धनावडे, सुरेश शिगवण व सर्व माजी विद्यार्थी परिवार यांनी स्व. विजयच्या कुटुंबियांना आधार देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

No comments:

Post a Comment

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !!

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !! *कोल्हापूर, दि. ७ सप्टेंबर...