Sunday 26 September 2021

शहरातील कचऱ्याच्या साम्राज्याबद्दल केडीएमसीचे आभार व्यक्त करत व्यक्त केला निषेध... "कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर पालिका प्रशासनासाठी लावले आभार प्रदर्शनाचे फलक"...

शहरातील कचऱ्याच्या साम्राज्याबद्दल केडीएमसीचे आभार व्यक्त करत व्यक्त केला निषेध...

"कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर पालिका प्रशासनासाठी लावले आभार प्रदर्शनाचे फलक"...


उमेश जाधव, टिटवाळा -: क.डों.पा. प्रशासन मांडा टिटवाळा परीसरातील कचऱ्याच्या व आरोग्याच्या समस्येवर लक्ष देत नसल्याने टिटवाळा एज्युकेशनल कल्याणकारी फाऊंडेशन आणि नागरिकांच्या वतीने आभार प्रदर्शनाचे फलक लावत प्रशासनाचा प्रतीकात्मक निषेध केला आहे.


"अ" प्रभाग क्षेत्रातील टिटवाळा परिसरात केडीएमसीच्या कामचुकारपणामुळे ठिकठीकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून शून्य कचारा मोहीमचा फज्जा उडाला असून ती शून्यात जमा झाली आहे. शहरात पसरलेल्या या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रशन निर्माण झाला आहे. 


याबाबत नागरिकांतून वारंवार टिटवाळा एज्युकेशनल कल्याणकारी फाऊंडेशनच्याकडे तक्रारी येत होत्या. त्यानुसार फाऊंडेशनच्यावतीने प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला.  करदात्या नागरीकांना फाऊंडेशन कडून आवाहन आले होते.  आपण राहत असलेल्या अथवा आपल्या शहरात नजरेस पडलेल्या परिसरात कुठेही कचरा दिसला तर त्वरीत आम्हाला त्याची माहिती व फोटो तसेच व्हिडीओ पाठवावीत. त्यानुसार आम्ही करदात्या नागरीकांसोबत त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर महापालिकाचे आभार व्यक्त करणाचे फलक त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर ठेवणार आहोत. हे आवाहन केल्यानंतर नागरीकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार दिनांक २६ रोजी टिटवाळा एज्युकेशनल कल्याणकारी फाऊंडेशनकडे  करदात्या नागरीकांना नियमित कर भरुन हि कचऱ्यासंदर्भात असुविधा निर्माण होत असल्याची माहिती जागरूक नागरीकांनी दिली.  त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली व तेथे निर्माण झालेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर टिटवाळा फाऊंडेशनच्यावतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचे आभार व्यक्त करणारे फलक लावुन प्रतिकात्मक निषेध व्यक्त केला. तसेच महापालिका प्रशासनाला विनंती करण्यात आली की आधीच कचऱ्याच्या बाबतीत भरमसाठ कर वाढविले असुन आता तरी करदात्या नागरीकांना सुविधा द्यावी. या प्रसंगी टिटवाळा एज्युकेशनल कल्याणकारी फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय(भाऊ) देशेकर तसेच कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !!

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !! मुंबई (शांताराम गुडेकर) :       ...