Tuesday 28 September 2021

अखेर सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांच्या लढ्याला यश !! ***उपोषणाचे हत्यार उपसताच सां.बा.राष्ट्रीय महामार्ग प्रशासन हादरले **

अखेर सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांच्या लढ्याला यश !!

***उपोषणाचे हत्यार उपसताच सां.बा.राष्ट्रीय महामार्ग प्रशासन हादरले **


मुरबाड ,(मंगल डोंगरे) :
कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्ग या रस्त्याची झालेली चाळण व पडलेले हजारो खड्डे, त्यात दैनदिन प्रवास करणा-या प्रवाशांना करावा लागणारा धोकादायक प्रवास आणि होणारे अपघात पाहता 


सदर रस्त्याचे म्हारळ ते पाचवा मैल पर्यंत तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे. म्हारळ ते माळशेज घाट रस्त्याच्या दोन्ही कडेचे गवत तात्काळ काढण्यात यावे. शहाड पुलावरील खड्डे तात्काळ भरण्यात यावेत. म्हारळ, कांबा, वरप गावातील पाण्याच्या विसर्गाची व्यवस्था करणे, माळशेज-मुरबाड मार्गे, मुंबई-भिंवडी कडे जाणा-या अवजड वाहणांसाठी रायते पुलापासुन -कल्याण फाट्यापर्यंत नवीन रस्त्याची निर्मिती करणे, अशा मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते, रमेश हिंदूराव यांनी संबंधित खात्यांकडे अनेकदा पत्रव्यवहार करून धोकादायक बाबी प्रशासना समोर मांडण्याचा प्रयत्न केला. 


मात्र ढिम्म प्रशासनाने याकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आज अखेर म्हारळ, कांबा, वरप, ग्रामस्थांसह पदाधिकारी यांचे सोबत बेमुद्दत धरणे आंदोलन आणि उपोषण सुरू करताच, सां.बा.व राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागली आणि डांबरी रोडवरील हेलकावे खात करावा लागणारा होडीचा प्रवास आता लवकरच संपणार असल्याचे अधिकारी वर्गानी प्रत्यक्षात उपोषण कर्त्यांची भेट घेऊन लेखी पत्र देवुन यातील, 


मागणी क्रमांक -1)-20 आँक्टोबर पर्यंत कांक्रीटीकरण सोडून  रस्त्याच्या दोन्ही बाजुचे डांबरी करण केले जाईल. 2) धोक्याच्या वळणावरील गवत सरकारी मजुरांकडुन काढण्याचे काम सुरु आहे. ते शेवट पर्यंत पुर्ण केले जाईल. 3) 7 आँक्टोबर पासून काँंक्रीटी करणाचे काम सुरू करण्यात येईल. 4 ) वाहतूक विभागाची परवानगी मिळताच शहाड पुलावरील खड्डे तात्काळ भरण्यात येतील. 5 ) म्हारळ, वरप, कांबा गावातील पाण्याचा विसर्ग करण्यासाठी या परीसरातील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन उंच आणि मोठ्या मो-या बांधल्या जातील. तसेच 6) कल्याण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आपण सुचविलेल्या रायता पुलापासुन मुंबई, भिंवडी, कल्याण फाट्यापर्यंतच्या नविन रस्त्याबाबतचे मागणी पत्र वरीष्ठांकडे तात्काळ पोहचविले जाईल. असे लेखी आश्वासन दिल्याने अखेर उपोषण कर्ते रमेश हिंदूराव  महेश देशमुख , विवेक गंभीरराव, अश्विन भोईर, लक्ष्मण सुरोशी, योगेश देशमुख, अश्फाक शेख यांनी अधिका-यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. 

No comments:

Post a Comment

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !!

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !! मुंबई (शांताराम गुडेकर) :       ...