Monday 27 September 2021

कम्युनिस्ट पार्टी तर्फे शेतकरी आंदोलनास पाठिंबा म्हणून रस्ता रोको आंदोलन !!

कम्युनिस्ट पार्टी तर्फे शेतकरी आंदोलनास पाठिंबा म्हणून रस्ता रोको आंदोलन !!


चोपडा.. येथे भारतीय कम्युनिस्ट पार्टी तर्फे मोदी सरकारने गेल्यावर्षी केलेल्या तीन कृषी कायद्याविरुद्ध व चार कामगार श्रम संहिताविरुद्ध तसेच जनविरोधी कार्पोरेट धार्जिण्या देश विकाऊ धोरणांविरुदध देशातील डावे पक्ष व काँग्रेस आदी विरोधी पक्षांतर्फे आयोजित भारत बंद आंदोलनात सहभाग म्हणून चोपडा येथे धरणगाव चौफुलीवर काल ११.३० वा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 


त्यावेळी ३ कृषी कायदे रद्द करा ४ श्रम संहिता रद्द करा.कॉर्पोरेट धार्जिणे मोदी सरकार चा निषेध असो "अशा जोरदार घोषणा आंदोलकांनी दिल्या व पाटा नजीक रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड अमृत महाजन, गोरख वानखेडे ,शांताराम पाटील, वासुदेव कोळी, आरमान तडवी, हाजी साहब, जियाउद्दीन काझी, फिरोज शेख, आत्माराम पाटील, राधेश्याम माळी, आदी पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होते पोलिसांचा बंदोबस्त कडक होता.


तहसीलदारांना सादर निवेदनात नमूद  *.. शेतकऱ्यांचा विरोधातील 3 काळे कायदे रद्द करा कामगारांना बरबाद करणाऱ्या चार श्रम सहिता रद्द करा *नवीन विज कायदा रद्द करा* *बेरोजगारी हटाव* *ीवनावश्‍यक वस्तूंची प्रचंड भाव वाढ रोखा* *पेट्रोल डिझेल गॅस औषधी यांची महागाई रोखा* *शेतीमाल सोयाबीन कापूस धान्य भाजीपाला भावाची परवड रोखा* *सरसकट चाललेले बँक विमा रेल्वे आदी जनतेच्या घामाच्या पैशातून निर्माण झालेल्या मालमत्ता व संस्थांची चाललेली लय लूट व विक्री बंद करा शेतीमालाला हमीभाव मिळावे म्हणून नवीन एम एस पी  कायदा तयार करा. केरळच्या धर्तीवर भाजीपाल्याचे  हमीभाव बांधून द्या * * ग्रामपंचायत कर्मचारी यांचे थकीत पगार ध्या* *शेतकरी कामगार व्यापारी जनतेला गुलामगिरीपासून वाचवा..* .या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पत्रकात माहिती दिली आहे.



No comments:

Post a Comment

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !!

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !! कल्याण, प्रतिनिधी : जिजाऊ संघट...