Monday, 27 September 2021

शेतकरी कामगार पक्ष तालुका तळा यांच्या माध्यमातून तळा पोलीस ठाण्यास एचपी प्रिंटर प्रदान ! शेकापच्या दातृत्व गुणांचे सर्वत्र कौतुक !!

शेतकरी कामगार पक्ष तालुका तळा यांच्या माध्यमातून तळा पोलीस ठाण्यास एचपी प्रिंटर प्रदान ! शेकापच्या दातृत्व गुणांचे सर्वत्र कौतुक !! 


     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) : तळा तालुका आरडीसी बैंक संचालक ज्ञानेश्वर भोईर शेठ, शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान चिटणीस तथा महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती अध्यक्ष धनराज गायकवाड शेकाप यांच्या प्रयत्नाने लहुशेठ चव्हाण यांच्या माध्यमातून तळा पोलीस ठाण्यास एचपी प्रिंटर प्रदान करण्यात आला. 
      रायगड जिल्ह्यातील तळा तालुका हा भौगोलिक दृष्ट्या दुर्गम तालुका आहे. एकेकाळी माणगांव तालुक्याचा अविभाज्य भाग असलेला तळा तालुका प्रशासकीय दृष्ट्या कामकाजाच्या सुनियोजनासाठी विभक्त करण्यात आला. डोंगराळ भागात वसलेल्या या तळा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पोलीस ठाण्याच्या दैनंदिन कामकाजात अत्यंत उपयुक्त ठरेल असा प्रिंटर उपरोक्त शेतकरी कामगार पक्ष टीम च्या माध्यमातून तळा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे आणि पोलीस हवालदार पवार व पोलीस हवालदार पाटील यांच्या कडे शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस धनराज गायकवाड, तळा आरडीसी बैंक संचालक ज्ञानेश्वर भोईर, लहुशेठ चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तळा पोलीस ठाण्यास प्रदान केलेला हा इलेक्ट्रॉनिक प्रिंटर मुळे पोलीस ठाण्याच्या दैनंदिन  कामकाजास उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे तळा तालुका सामाजिक स्तरातून तळा शेतकरी कामगार पक्षाच्या सेवाभावी सहकारी भूमिकेचे आणि दातृत्व गुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती !

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती ! मुंबई, (शांतार...