Thursday 30 September 2021

ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणार - "जि. प.उपाध्यक्ष सुभाष दादा पवार"

ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणार - "जि. प.उपाध्यक्ष सुभाष दादा पवार"


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) :
ठाणे  जिल्ह्यातील शिक्षकांचे जिल्हास्तरावरील कोणतेही प्रश्न  प्रलंबित ठेवले जाणार नाहीत. असे आश्वासन ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष दादा पवार यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्ठमंडळास  दिले. 
     ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पाताई पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्यकार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, शिक्षणाधिकारी शेषराव बढे व प्रशासनातील सर्व विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत शिक्षक संघटनांची नुकताच एक महत्वपुर्ण बैठक आयोजित केली होती. या बैठकीत प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान भगत यांनी अनेक प्रश्न मांडले. पदवीधर प्रश्न सोडवावा, विकल्प विपरीत शिक्षकांना ठाणे जिल्ह्यात परत आणावेत, वेतन  समानीकरण करावे, निवडश्रेणीच्या यादीतील  दुरुस्त्या कराव्यात, वरीष्ठ वेतनश्रेणी घेणाऱ्या शिक्षकांना एकस्तर देण्यात यावा, पगारास  दिरंगाई करु नये, शाळांची बॅंक खाती शुन्य बॅलंस असल्याने शाळा सुरु होण्यापूर्वी स्वच्छतेचे साहित्य पुरवावे, अप्रशिक्षित सेवानिवृत्त शिक्षकांचा प्रश्न सोडवावा, सेवानिवृत्त विस्तार अधिकाऱ्यांची प्रलंबित वेतने अदा करावीत, दिव्यांग शिक्षकांचे प्रश्न सोडवावेत, केंद्रप्रमुख पदोन्नती करावी. उर्दु माध्यमाची रिक्त पदे  भरावीत. अशा अनेक प्रश्नांवर या बैठकीत तोडगा काढण्यात आला. 
       नुकताच विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक पदोन्नती, निवडश्रेणी, वरीष्ठ वेतनश्रेणी, हिंदी मराठी परीक्षा सुट यांसारखे प्रश्न सोडवले असल्याने जिल्ह्यातील शिक्षकांना खुप  मोठा दिलासा दिला आहे. हे  प्रश्नही लवकरच सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन अध्यक्षा, उपाध्यक्ष, मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यानी यावेळी बोलतांना दिले. 
    यासभेस ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने  जिल्हाध्यक्ष भगवान भगत, गणेश रिकामे, सोमनाथ सुरोशे, विलास पाटील प्रत्यक्ष उपस्थित होते तर वसंत पडवळ,प्रविण विशे, अनिल शेलार, रविंद्र  मोहपे, शैलेश ईसामे, आकांक्षा पवार, नितीन तारमळे, पंडीत  गायकवाड, गणेश गायकवाड, रविंद्र घरत, विकास भोईर, संतोष घिगे,व अनेक शिक्षक मोठ्याप्रमाणावर ऑनलाईन उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !!

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !! मुंबई (शांताराम गुडेकर) :       ...