Friday 31 December 2021

थर्टी फस्ट' व नवीन वर्षाच्या पाश्र्वभूमीवर कल्याण तालुका पोलिसांची चोख व्यवस्था, मार्गदर्शन, नोटिसा व कारवाई ?

'थर्टी फस्ट' व नवीन वर्षाच्या पाश्र्वभूमीवर कल्याण तालुका पोलिसांची चोख व्यवस्था, मार्गदर्शन, नोटिसा व कारवाई ?


कल्याण, (संजय कांबळे) : सध्या राज्यात कोरोना व ओमायक्राँँन च्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे कडक निर्बंध लागू केले आहेत. अशातच थर्टी फस्ट व नवीन वर्षाचे आगमन होत असताना नागरिकांनकडून कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होऊ नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, ड्रिंक व ड्राईव्ह वर आळा बसावा या करिता कल्याण तालुका पोलिसांनी मोक्याच्या ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केला असून सुरुवातीला मार्गदर्शन, नोटीसा व नाही च ऐकले तर प्रंसगी कठोर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे तालुक्यात तसा काही अनुचित प्रकार घडला नाही.


कल्याण तालुक्यातून कल्याण नगर हा महामार्ग जातो, तसेच तालुक्यात टिटवाळा येथे महागणपती मंदिर आहे, येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीला दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. अशाच परिस्थितीत थर्टी फस्ट आल्याने पोलिसांवर ताण वाढला आहे, तर दुसरीकडे राज्यात कोरोनाचे रग्ण झपाट्याने वाढत आहेत, ओमायक्राँने डोके वर काढले आहे, राज्यात पुन्हा लाँकडाऊन लागते की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या सर्व सण, उत्सव यांचा विचार करता शासनाने जमावबंदी, निर्बंध लागू केले आहे, वाहतुकीचे अनेक नियम लागू केले आहेत. अशातच थर्टी फस्ट च्या दिवशी अतिरेकी कारवाईची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


या सर्व परिस्थिती विचारात घेऊन कल्याण तालुक्यात पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी रामभालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली १० अधिकारी व ५० कर्मचाऱ्यांच्या मदतीने चोख व्यवस्था लावली आहे, गोवेली, खडवली, बल्याणी, म्हारळ आदी ठिकाणी नाकाबंदी केली आहे, येथे गाड्या कसून चौकशी केली जात आहे. दारुवाल्याच्या वर धडक कारवाई सुरू केली आहे. नियम मोडून गाडी चालवणे, बेदरकार चालकावर तसेच ड्रिंक व ड्राईव्ह वर लक्ष ठेवले जात आहे.

कोरोना व ओमायक्राँनच्या धर्तीवर शासनाच्या निर्बंधाचे पालन होते की नाही, यावर नजर ठेवली आहे.

तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाँटेल, धाबे, उपहारगृह, रिसॉर्ट, फार्महाऊस, यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. टपोरी, टवाळखोर, गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या व्यक्ती वर कारवाईचा धडाका चालू केला आहे. याशिवाय उद्या म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला टिटवाळा येथील महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांना मार्गदर्शन, गर्दी, टाळण्यासाठीचे आवाहन, वाहतूक व्यवस्था, मास्क, सँनिटायझर, सोशलडिंस्टिंसन आदी पाळण्याची विंनती करण्यात येत आहे. या सर्व घटनावर तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी स्वतः बारकाईने लक्ष ठेवून असल्याने अजून तरी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, याचे सर्व श्रेय कल्याण तालुका पोलिसांना द्यायला हवे.

No comments:

Post a Comment

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !!

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !! मुंबई,  (शांताराम गुडेकर ) :         बूड़ोकन कराटे ...