Friday 31 December 2021

कल्याण पंचायत समितीचे दोन कर्मचारी निवृत्त, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिका-यासह अनेकांनी दिल्या शुभेच्छा !!

कल्याण पंचायत समितीचे दोन कर्मचारी निवृत्त, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिका-यासह अनेकांनी दिल्या शुभेच्छा !!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण पंचायत समितीचे कुंटूब प्रमुख अर्थात गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या गाडीचे वाहनचालक गणेश महादेव कासार आणि आरोग्य विभागाचे कुष्ठ तंत्रज्ञ वासुदेव शंकर जाधव हे दोन कर्मचारी आज सेवानिवृत्त झाले, या निमित्त आयोजित कार्यक्रमात यांना गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या.


कल्याण पंचायत समितीचे वाहन चालक गणेश कासार हे १९९१ मध्ये वाहनचालक म्हणून नोकरीत रुजू झाले, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी, तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (आयसीडीएस) आदी वरीष्ठांच्या गाड्यावर वाहनचालक म्हणून काम केल्या नंतर त्यांची बदली कल्याण येथे झाली, ते गटविकास अधिकारी यांच्या गाडीचे वाहनचालक म्हणून कल्याण पंचायत समिती ला सेवा बजावल्यानंतर ते आज सेवानिवृत्त झाले, एकूण ३० वर्षे सेवा झाली असून त्यांचे शिक्षण ७ वी पर्यंत झाले आहे वडील मिलकामगार होते. 


मनमिळाऊ व सदैव हसमुख असलेल्या गणेश कासार आणि आरोग्य विभागाचे वासुदेव जाधव यांना कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भारत मासाळ, पत्रकार संजय कांबळे, आदीनी शुभेच्छा दिल्या.


जाधव हे १९९३ मध्ये नोकरीला लागले होते. ३८ वर्षे सेवा बजावल्यानंतर ते आज सेवानिवृत्त झाले. प्राथमिक आरोग्य केंद्र शेणवा आणि आता कल्याण पंचायत समितीच्या आरोग्य विभागात ते कुष्ठ तंत्रज्ञ म्हणून सेवा करीत होते. यावेळी जिल्हा परिषद वाहनचालक संघटना, ग्रामसेवक संघटना, आरोग्य कर्मचारी, कल्याण पंचायत समितीचे शिपाई, आदीनी या दोघांचा सत्कार केला. व शुभेच्छा दिल्या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी श्री चव्हाण यांनी केले.


यावेळी पशुसंवर्धन अधिकारी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक, आणि कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !!

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !! मुंबई,  (शांताराम गुडेकर ) :         बूड़ोकन कराटे ...