Friday 31 December 2021

नववर्षी अध्यात्मिक संकल्प घेऊया - संत राजिन्दर सिंह जी महाराज

नववर्षी अध्यात्मिक संकल्प घेऊया
-  संत राजिन्दर सिंह जी महाराज


नववर्षाच्या आगमनाच्या आनंदा समयी  आपण नेहमी असा विचार करतो की,  येणारे नवीन वर्ष मागील वर्षाच्या तुलनेत कसे चांगले होईल? आपण असा विचार करतो की आपले मागील वर्ष कसे व्यथित झाले?आणि आपण येणाऱ्या वर्षाकरिता नवीन संकल्प घेतो. हे संकल्प आपल्या स्वास्थ्या मधील सुधारणा,आर्थिक स्थितीतील  वाढ,  आपांपसातील नातेसंबंधातील गोडवा किंवा इतर शारीरिक तसेच मानसिक उद्देशानं संबंधित असू शकतात. 

नवीन वर्ष आपणास ही संधी प्रदान करते कि आपण जुन्या बाबी सोडून नव्या गोष्टींचा स्वीकार करावा. बहुतेक लोक आपल्या चुकीच्या सवयी बदलू इच्छितात त्यामुळे ते नवीन वर्षी त्यांना सोडण्याचा आणि चांगल्या सवयीनां स्वीकारण्याचा संकल्प करतात. नववर्षाच्या याप्रसंगी बरेचसे लोक आपले स्वास्थ, आपली धनदौलत अथवा आपले परस्पर संबंध वृद्धिंगत होण्याचा प्रण करतात आणि नवे ध्येय ठरवितात. परंतु काही दिवसानंतर ते पुन्हा आपल्या जुन्या दिनचर्या मध्ये परत येतात. या ऐवजी आपण बरेच संकल्प घ्यावे आणि त्यांना पूर्ण करू शकलो नाही तर, त्याकरिता आपण असे करावे की एक संकल्प घ्यावा आणि त्याला चांगल्या प्रकारे जीवनात निभवावे. जर आपण एकाच संकल्पाला प्रमुखता दिली तर, आपल्याला  त्याला पूर्ण करण्याची शक्यता अधिक असू शकते.

अध्यात्मिक संकल्प सर्वात महत्त्वपूर्ण आहे कारण की, ते आपल्या आत्म्या संबंधित असतात. अध्यात्मिकता आपल्या ला स्वतःला ओळखणे आणि परमेश्वराला प्राप्त करण्याचा मार्ग दाखविते. ही महत्त्वाची बाब आहे की जेव्हा आपण अध्यात्मिक संकल्प घेतो, तेव्हा आपण आपल्या ध्येयावर ठाम रहावे.त्यावेळी आपण कोणाला शाश्वती देतो आहोत, आपण आपला आत्मा अर्थात आपण स्वतः आणि परमेश्वराला शब्द देत आहोत.  असं वचन आपण अवश्य निभावले पाहिजे.अध्यात्मिक मार्गाचे अनुसरण करताना सर्वप्रथम सदाचारी जीवन आहे, याकरिता आपल्या अंतरी अहिंसा, सत्य,पवित्रता, नम्रता, निष्काम सेवा या सदगुणांना विकसित केले पाहिजे.

प्रभूने आपणांस जे शरीर दिले आहे त्यामध्ये आपण स्वतःला ओळखू शकतो आणि प्रभूला प्राप्त करू शकतो. याकरिता आपल्याला हे जाणून घेतले पाहिजे की, प्रभूला आपण आपल्या अंतरी कसे शोधू शकू. या दुनियेत जेवढे पण संत- सुफी आले आहेत, ते वारंवार हेच सांगतात की, आपण अंतर्मुख होऊन प्रभूला प्राप्त करू शकतो. हे सर्व याच अभ्यासाकडे इशारा करतात की, आपण आपले लक्ष बाहेरून हटवून आपल्या अंतरी टिकवावे. ज्याद्वारे आपण आपल्या अंतरी परमपिता परमेश्वराचे स्वरुप ज्योती आणि श्रुती चा अनुभव घेऊ शकतो. या दोन्हींवर ध्यान एकाग्र करून आपण 
परमपिता परमेश्वरात लीन होऊ शकतो.

चला तर! नववर्षाचा या प्रसंगी आपण असा संकल्प घेऊया की, आपली आध्यात्मिक उन्नती होण्याकरिता यावर्षी नियमितपणे ध्यान अभ्यासाकरिता वेळ देऊ या, जेणेकरून आपण आपल्या अंतरातील विद्यमान प्रभूच्या ज्योती आणि श्रुतीचा अनुभव करूया.

सावन कृपाल रुहानी मिशन, सावन आश्रम, संत कृपाल सिंह जी महाराज चौक, खेमानी रोड, उल्हासनगर- 2

अमृता : +91 84510 93275

No comments:

Post a Comment

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !!

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !! मुंबई,  (शांताराम गुडेकर ) :         बूड़ोकन कराटे ...